Marathi Biodata Maker

मुंबईचा नवा महापौंर मुंबईकरांचे स्वप्न साकार करणार का ?

Webdunia
गुरूवार, 9 मार्च 2017 (12:11 IST)
अधिकारी बदलले कि, सूत्र देखील बदलतात. या बदलत्या सूत्रांचा परिणाम सामान्य नागरिकांवर आणि त्याबरोबरच शहरावर देखील होत असतो. राज्यात नुकत्याच झालेल्या  पालिका निवडणुकांचे मोठे उदाहरण आपल्यासमोर आहे. खास करून  मुंबई शहराच्या आर्थिक उलाढाली सांभाळणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे हे सूत्र अनेक काळापासून निरंतर सुरु आहे. नुकतीच  विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या  महापौरपदी नियुक्ती झाली असून, त्यांचा नवा कार्यकाल शहराला लागू होणार आहे. अधिकाराची ही खांदेपालट सामान्य जीवनात कशापद्धतीने परिणाम करते, याचे वास्तव 'ट्रकभर स्वप्न' या आगामी सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

अभिनेते, चित्रपट- कलादिग्दर्शक, दिग्दर्शक तसेच निर्माते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले  नितीन चंद्रकांत देसाई लोकांना प्रत्येकवेळी काहीतरी वेगळे देण्याचा  प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न त्यांनी 'ट्रकभर स्वप्न' या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे. 

आयकॉनिक चंद्रकांत प्रॉडक्शन  प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली  सादर होणारा हा सिनेमा एका महत्वाकांक्षी तरुणाच्या जीवनावर भाष्य करतो.सरकारी खात्यातील बदलत्या नियमांची झळ सामान्य कुटुंबावर कशी पडते,यावर हा सिनेमा बेतला आहे. विशेष म्हणजे यात मकरंद देशपांडे प्रमुख भूमिकेत असून, क्रांती रेडकरची देखील एक महत्वपूर्ण व्यक्तिरेखा सिनेमात  आहे. प्रमोद पवार दिग्दर्शित हा सिनेमा सामान्य मुंबईकरांच्या भावना आणि त्यांच्या महात्वाकांक्षेवर आधारित आहे. स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकांची हृदयस्पर्शी कथा मांडणारा  हा कौटुंबिक सिनेमा लवकरच सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 
 
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

मुंबई: वांद्रे परिसरात रेल्वेच्या जमिनीवर बांधलेली बेकायदेशीर मशीद पाडताना बुलडोझर कारवाईदरम्यान गोंधळ; अनेक पोलीस जखमी

LIVE: ऑनलाइन औषध विक्रीच्या निषेधार्थ देशभरातील आणि महाराष्ट्रातील केमिस्ट मोठ्या संपावर

पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची दिवसाढवळ्या हत्या

पुण्यातील रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान ६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल! ओबीसी नॉन-क्रिमी लेयर उत्पन्न मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस

पुढील लेख
Show comments