Marathi Biodata Maker

मुंबई रेल्वेचे स्टेशन आणि वेळ बदलली, या एक्सप्रेसमध्ये मिळणार फर्स्ट AC ची सेवा

Webdunia
सोमवार, 1 जुलै 2024 (09:48 IST)
Western Railways : रेल्वेने मुंबई मधून सुटणाऱ्या दोन जोडी रेल्वेच्या टर्मिनल्स मध्ये बदल केले आहे. यासोबतच रेल्वेची वेळ देखील संशोधित करण्यात आली आहे.
 
Mumbai News : पश्चिम रेल्वेनुसार, रेल्वे संख्या 19003/04 बांद्रा टर्मिनस-भुसावल खानदेश एक्सप्रेस आणि रेल्वे संख्या 09051/52 मुंबई सेंट्रल-भुसावल एक्सप्रेस आता दादर स्टेशनवर चालणार आहे. तर, रेल्वे संख्‍या 19015/19016 दादर-पोरबंदर एक्सप्रेस मध्ये एक फर्स्‍ट एसी कोच जोडण्यात येत आहे. 
 
19003/04 बांद्रा टर्मिनस-भुसावल खानदेश एक्सप्रेस
रेल्वेने सांगितले की 19003 बांद्रा टर्मिनस-भुसावल खानदेश एक्सप्रेसचा  टर्मिनल बांद्रा टर्मिनसच्या जागी आत दादर करण्यात आले आहे. रेल्वे संख्या जी वर्तमान मध्ये प्रत्येक मंगळवारी, गुरवार व रविवारी 00.05 वाजता बांद्रा टर्मिनस वरून निघायची. ती आता 4 जुलै पासून प्रत्येक  मंगळवार, गुरुवार आणि रविवारी 00.05 वाजता दादर वरून सुटणार आहे. तसेच या रेल्वेच्या मध्यवर्ती स्टेशनवर थांबण्याच्या वेळेमध्ये कोणताही बदल होणार नाही.
 
याप्रकारे 19004 भुसावल-दादर खानदेश एक्सप्रेस 4 जुलैपासून बांद्रा टर्मिनसच्या ऐवजी दादर स्‍टेशन वर 05.15 वाजता पोहचणार आहे, जो या रेल्वेचा शेवटचा स्टॉप असेल. नवसारी व बोरीवली स्टेशनमध्ये आगमन आणि प्रस्थानच्या वेळेमध्ये संशोधन करण्यात आले आहे. हा बदल येत्या निवडणुकीपर्यंत अस्थायी आधार वर करण्यात आला आहे.
 
• 09051/52 मुंबई सेंट्रल-भुसावल एक्सप्रेस
रेल्वे संख्या 09051/09052 मुंबई सेंट्रल-भुसावलचे टर्मिनल मुंबई सेंट्रलच्या ऐवजी दादर करण्यात आले आहे. 09051 दादर-भुसावल एक्सप्रेस आता मुंबई सेंट्रलच्या जागी प्रत्‍येक सोमवार, बुधवार आणि शनिवारी 00.05 वाजता दादरवरून निघणार आहे. या रेलेच्या मध्‍यवर्ती स्टेशनवर थांबण्याच्या वेळेमध्ये बदल होणार नाही. हा बदल 3 जुलै पासून प्रभावी होईल.
 
या प्रकारे, रेल्वे संख्या 09052 भुसावल-दादर एक्सप्रेस 3 जुलैपासून मुंबई सेंट्रलच्या ऐवजी दादर स्‍टेशन वर 05.15 वाजता टर्मिनेट होईल.या रेल्वेनां3 जुलै पासून 27 सप्टेंबर पर्यंत विस्‍तारित करण्यात आले आहे.
 
• 19016/19015 पोरबंदर-दादर एक्सप्रेस
रेल्वेने 19016 पोरबंदर-दादर एक्सप्रेस मध्ये 1 जुलै पासून आणि 19015 दादर-पोरबंदर एक्सप्रेस मध्ये 4 जुलै पासून आगामी सूचना पर्यंत एक फर्स्‍ट एसी कोच जोडला आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

FIH पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जर्मनीने भारताचा पराभव केला

मुंबई विमानतळावर आज सकाळी इंडिगोची पाच उड्डाणे रद्द

संसदेत वंदे मातरम वर १० तासांची चर्चा होणार; पंतप्रधान मोदी लोकसभेत आणि अमित शाह राज्यसभेत करतील सुरवात

नागपुरातील गडकरी जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थित; अपंगांनी व्यक्त केली कृतज्ञता

Maharashtra Winter Session नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू; प्रत्येक मुद्द्यावर होणार चर्चा

पुढील लेख
Show comments