Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलं पळवणाऱ्या अफवेचं नागपुरात जमावाकडून महिलेला मारहाण

Webdunia
नागपूर येथे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या ठिकाणी सर्व मंत्री उपस्थित आहे. पोलिसांची मोठी कुमक आहे. मात्र याच नागपुरात   मुलं पळवणाऱ्या अफवेचं  नागपुरात जमावाकडून महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणात महिलेला जमावाने बेदम मारहाण केली आहे. 

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी इथे जयश्री रामटेके नावाच्या महिलेला जमावाने अशाच संशयावरुन मारहाण केली. मात्र, पोलिस वेळेवर आल्याने तिचा जीव वाचला आहे.नागपूरच्या जरीपटका पोलिस स्टेशन हद्दीतील हुडको कॉलनीत जयश्री रामटेके  राहतात. पक्षाघात झालेल्या रुग्णांना तेल मालिश त्या करतात. 

पारशिवनी तालुक्यातील करंभाड गावात जयश्री वपरिसरातून  जात असताना लहान मुले खेळत होती.  मुलांनी जयश्रीची वेशभूषा पाहून मुलांनी चोर-चोर ओरडण्यास सुरुवात केली. मुलांच्या आवाजाने परिसरातील महिला-पुरुष जमा झाले. त्यांनी जयश्रीला  घेरुन प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. सध्या मुलं चोरणाऱ्या टोळीची अफवा असल्याने जमावाने तिला चोर समजून मारहाण करण्यास सुरुवात केली होती.

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिलीप आगरकर आणि महिला पोलिस कर्मचारी संगीता घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी सुमारे 200 जणांचा जमाव होता. महिला पोलिस कर्मचारी संगीता यांनी जमावाच्या तावडीतून जयश्रीला आपल्या ताब्यात घेतलं. नंतर पोलिस उपनिरीक्षक दिलीप आगरकर यांनी आपल्या बाईकवर बसवून तिला पोलिस स्टेशनला आणले होते. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments