rashifal-2026

नारायण राणे कृपया लवकर बरे व्हा

Webdunia
शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (08:38 IST)
नारायण राणे यांनी  पत्रकारपरिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी ”मला मारण्यासाठी शकील, छोटा राजन यांना उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती”, असा आरोप केला. त्याला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“नारायण राणे यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांची जी अवस्था झाली होती. ते बघून मी एवढंच म्हणेल, नारायण राणे कृपया लवकर बरे व्हा”, अशी प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली.
काय म्हणाले होते नारायण राणे?
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. “मला मारण्यासाठी शकील, छोटा राजन यांना सुपारी दिली होती. काय झालं मारलं का कोणी? मी जिवंत आहे. मी तुम्हाला पुरून उरेन. आता तुम्ही एकनाथ शिंदेवर बोलताय, काय तर म्हणे पदं दिली. उपकार नाही केले. ही शिवसेना वाढवली कोणी, टिकवली कोणी, सत्तेपर्यंत आणली कोणी? केवळ शिवसैनिकांनीच”, असा आरोप नारायण यांनी केला होता.

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

आसामचा चहा २७ देशांमध्ये शुल्कमुक्त निर्यात केला जाईल; दिब्रुगडमध्ये अमित शाह यांनी केल्या घोषणा

LIVE: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारख्यात बदल

सोनं-चांदीचा नवा रेकॉर्ड

लग्नाच्या दोन महिन्यांनंतर पत्नी प्रियकरासोबत पळून गेली, पती आणि मेहुण्यांनी आत्महत्या केली!

ऑस्ट्रेलियात भारताच्या टेनिसपटू जेन्सी कनाबरने इतिहास रचला

पुढील लेख
Show comments