Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोविड रुग्णालये सुरूच राहणार.. बंदचा निर्णय मागे.

Webdunia
शुक्रवार, 4 जून 2021 (08:38 IST)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसेवा करता करता आम्ही थकलो आहे तसेच रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे सरकारी रुग्णालयात देखील उपचार करण्याची सुविधा असल्याचे कारण देत कोविड रुग्णसेवा बंद करण्याचा एकतर्फी निर्णय अखेर नाशिक  हॉस्पिटल ओनर असोसिएशनने मागे घेतला आहे.
 
याप्रकरणी कारवाई येण्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे व महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्यानंतर अवघ्या २४ तासांतच हा निर्णय मागे घेतला गेला. तत्पूर्वी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी असोसिएशनच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कोविड रुग्णसेवा अखंडितपणे सुरू ठेवण्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
दरम्यान, डॉक्टरांना सोसाव्या लागत असलेल्या मानसिक व सामाजिक दबावामुळे रुग्णसेवा बंद करण्याची परवानगी केवळ मागितली होती. आता आयुक्तांनी असोसिएशनच्या मागण्या, समस्या सामंजस्याने सोडविण्याचे आश्वासन दिले असल्यामुळे कोविड रुग्णसेवा अखंडीतपणे सुरू राहील असे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, उपाध्यक्ष डॉ. राज नगरकर यांनी स्पष्ट केले.
 
शहरात कोरोना रुग्णांकडून लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. ही कथित लू’ट रोखण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या बिलांची तपासणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला. मात्र त्यानंतरही जादा बिल आकारण्याच्या तक्रारी कायम असल्यामुळे पालिकेने क’डक कारवाईचा इशारा दिला होता. तसेच सामाजिक संघटना कार्यकर्त्यांनी आं’दोलन सुरू केल्याचे बघून हॉस्पिटल ओनर असोसिएशनने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह राज्याचे आरोग्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना पत्र पाठवत कोरोना रुग्णसेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कळविले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments