Festival Posters

एकावन्न कला अविष्कारांचा नाशिक ढोलचा विक्रम

Webdunia
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (11:17 IST)
नशिकचा ढोल महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यातही नाशिक मधील अनेक पथके नव नवीन प्रयोग करत असतात. असाच प्रकार पुन्हा केला आहे शिवराय ढोल पथकाने. स्थानिक कलागुणांना वाव मिळावा, संस्कृतीची जोपासना व्हावी, श्लोकांचे आजच्या पिढीला महत्त्व कळावे या करीता ‘एक ताल एक श्लोक’ असा अभिनव प्रयोग केला गेला आहे. यामध्ये ५१ कला सादर केल्या आहेत. या उपक्रमाची नोंद जिनिअस बुक, एशिया बुक व वर्ल्ड रिकॉर्ड बुक इंडिया, वंडर बुक आॅफ लंडन यामध्ये या उपक्रमाची नोंद करण्यात आली आहे.
 
गंगापूररोड परिसरातील ढोलवादनाचा उपक्रम आयोजित केला, शुभश्री बहुद्देशीय संस्थेच्या विविध चित्रकार, शिल्पकार,कलाकारांनी तब्बल ५१ पेक्षा अधिक कलांमधून विविध कलाकृतींचे सादरीकरण केले आहे. त्यासोबतच श्लोक म्हणत  ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पठण करत उपस्थित वादक, कलाकार, चित्रकारांना त्यांनी साथ दिली आहे.
 
या अभिनव प्रयोगात जवळपास  दोनशे वादक सहभागी झाले होते. या वादकांनी शिवताल, ढोलीबाजा, गझर, नाशिकढोल, भीमरुपी, भांगडा, पुणे ढोल, संबळ, रमणबाग सुमारे ५१ तालांवर वादकांनी ढोल-ताशाचे वादन केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

पुणे शिवसेना मध्ये लवकरच शहरस्तरीय नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले

Ashok Kharat Case: सातव्या प्रकरणात १२ मे पर्यंत तुरुंगवास; अशोक खरातच्या अडचणी वाढल्या

LIVE: महाराष्ट्रात 'एक राष्ट्र, एक ई-चलन' योजना लागू, वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक कठोर

महाविकास आघाडीत फूट? अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला काँग्रेसचा विरोध

महाराष्ट्र सरकारने रिक्षा-टॅक्सी चालकांना 'व्यावहारिक मराठी' शिकवण्यासाठी एक उपक्रम सुरू केला; मंत्रिमंडळ बैठकीत मार्गदर्शिका प्रकाशित

पुढील लेख
Show comments