Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक - संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पहिला पुर; गंगापूर धरणातून आता "इतक्या" पाण्याचा विसर्ग

Webdunia
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (21:34 IST)
नाशिक जिल्ह्यात काल सायंकाळपासून सुरू असलेल्या सतत च्या पावसामुळे गोदावरी नदीला यावर्षी पहिला पूर आला आहे.गंगापूर धरणातून रात्री 8 वाजता 2208 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने संध्याकाळ पासून एकूण 6282 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात 62.4 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर हरणबारी, गिरणा आदी धरणातुनही पाणी सोडण्यात आले आहे.गंगापूर धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार चालू आहे. पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्याटप्याने वाढवण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. गोदावरी नदीला या हंगामातील पहिला पूर आला आहे.
 
या पुरामुळे रामकुंड परिसरातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्यामुळे पूरस्थितीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

तसेच गिरणा नदी पात्रातील पाणी विसर्गात चनकापूर धरण -   33000 क्युसेस, पुनद धरण -  16000 क्युसेस, मोसम नदी पात्रातील पाणी विसर्ग, हरणबारी धरण - 5500 क्युसेस, आरम नदी पात्रातील पाणी विसर्गात केळझर धरणातून - 5000 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

...नाहीतर मराठा नेत्यांना परिणाम भोगावे लागतील, मनोज जरांगेंचा इशारा

पोर्शे कार अपघातात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्व शरद पवारांनी राहुल गांधींची घेतली भेट

शरद पवारांकडून राहुल गांधींना पंढरपूर वारीला येण्याचे निमंत्रण

हाथरस घटनेबद्दल खासदार प्रियंका चतुर्वेदींचा मोठा जबाब, 'सत्संग करण्याऱ्या बाबांवर देखील...'

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पात्रतेच्या अटी बदलल्या, अर्जाची तारीखही वाढवली, जाणून घ्या नवे बदल

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन

संत नामदेव महाराज

मुंबईचा गोखले ब्रिज झाला तयार, BMC ने सुधारली चूक ज्यावर उठला होता विनोद

Sensex : शेअर बाजारात सेन्सेक्सने पहिल्यांदा 80 हजारांचा टप्पा पार केला, निफ्टी 24300 च्या जवळ

पुढील लेख
Show comments