Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक :नेपाळी युवकाच्या खूनामागे प्रेमप्रकरणाचे कारण

murder
Webdunia
शुक्रवार, 5 एप्रिल 2024 (10:02 IST)
पाईपलाईन रोड वरील युवकाच्या खुनाचा उलगडा करण्यात सातपूर पोलिसांना यश आले आहे.  सातपूरमध्ये नेपाळी युवकाच्या खूनामागे प्रेमप्रकरण असल्याचे समोर आले असून हॉटेलमध्ये एकत्र काम करणार्‍या मित्रानेच हा खून केल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
सातपूरच्या पाईपलाईन रोडवर कौशल्य व्हिला येथे राहणारा युवक महेंद्र प्रकाश सार्की (वय २२) याचा गळा चिरून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी सातपूर पोलिसांत अज्ञात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव यांनी तपासकामी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांना मार्गदर्शन केले.
 
तपासादरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले की, मयत महेंद्र सार्की हा नेपाळमधील एका मुलीच्या संपर्कात होता. त्याचा मित्र ईश्वर याच्यासमोर तो तासनतास तिच्याशी फोनवर गप्पा मारायचा. हे ईश्वरला खटकायचे. ईश्वरने तिला मेसेज करुन तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र महेंद्र आपल्यासमोर मुद्दाम बोलत असल्याने त्याच्या मनात महेंद्रविषयी राग होता.
 
ईश्वरने त्याचा साथीदार प्रकाश सेठी याच्या मदतीने त्याचा काटा काढायचे ठरवले. अखेर त्याने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करुन त्याला ठार मारले. सातपूर पोलिसांनी ईश्वर व प्रकाश या दोन्ही आरोपींना  काल रात्री  अटक केली असून, त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

2,700 कोटी रुपयांच्या 'नमामी गोदावरी' प्रकल्पाला सरकारने हिरवा कंदील दाखवला

सोलापुरात विहीर कोसळल्याने पोहण्यासाठी गेलेली 2 निष्पाप मुले ढिगाऱ्यात अडकली,मृतदेह सापडले

LIVE: नमामी गोदावरी' प्रकल्पाला सरकारने हिरवा कंदील दाखवला

23 वर्षीय शिक्षिका 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यापासून गर्भवती

महाराष्ट्र काँग्रेसने जातीच्या जनगणनेचे स्वागत केले, हर्षवर्धन सपकाळने दिले राहुल गांधींना श्रेय

पुढील लेख
Show comments