Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक : हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींना जबरदस्तीने पर्यटकांसमोर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार

Webdunia
बुधवार, 21 जून 2023 (08:25 IST)
वसतिगृहातील मुलींना रात्री पर्यटकांसमोर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिमध्ये घडला आहे. याप्रकरणी, संस्थेचे चालक आणि शिक्षिकेविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी (पो. सामुंडी) येथील सर्वहरा परिवर्तन केंद्रात शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनींना बळजबरीने नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खासगी संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचण्यास सांगितले जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मुलींनी पर्यटकांसमोर नाचण्यास नकार दिला त्यांना दमदाटी व छड्यांनी मारहाण केली जात असल्याचेही समोर आले आहे. मुलींनीच पालकांकडे ही तक्रार केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
 
मुलींनी तक्रार करताच पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. तसेच, घडलेल्या प्रकारानंतर पालकांनी मुलींना वसतिगृहातून घरी आणले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथे ही घटना घडली आहे.
 
संस्थेच्या शाळेमागील टेकडीवर हॉटेल आहे. तेथे मे महिन्याच्या अखेरीस काजवे पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यांच्यासमोर सायंकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान जबरदस्तीने नाचण्यास सांगितले जाते, असा आरोप वसतिगृहातील मुलींनी केला आहे.
 
नाचले नाही तरी शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरून दमदाटी करतात व छड्या मारतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली. त्यानंतर संतप्त पालकांनी मुलींना घरी आणत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याप्रकरणी राजू उर्फ वादीराज भीमराज नाईक (रा. राणेनगर, नाशिक) आणि शिक्षिका माधुरी गवळी यांच्या विरोधात मुलींच्या पालकांनी फिर्याद दिल्याने वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
ह्या धक्कादायक प्रकारामुळे इगतपुरी- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. संशयित आरोपी अद्याप अटक करण्यात आलेले नाहीत. या घटनेचा संपूर्ण तपास नासिक ग्रामीण उपअधिक्षक सुनील भामरे यांच्याकडे देण्यात आला आहे. एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आणि महिला बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. महिला बाल हक्क आयोगाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत अशी माहिती मधे यांनी दिली.
 
मुलींना जबरदस्तीने पर्यटकांसमोर नाचवले जात असल्याचा आरोप वसतिगृहाचे चालक व तेथील शिक्षिकांनी फेटाळून लावला आहे. आरोपांबाबत एका शिक्षिकेने सांगितले आहे की, आम्ही मुलींना केवळ पारंपरिक नृत्य शिकवतो. त्यांना इतरांसमोर नाचण्यास सांगितलेले नाही. शिक्षिका मुलींना नृत्य शिकवत असताना कदाचित पर्यटक ते पाहत असतील. असं स्पष्टीकरण शिक्षिकांनी दिलं.

Edited By - Ratnadeep ranshoor 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातून निवडणुकीपूर्वी 13.26 कोटी रुपयांचे अवैध साहित्य जप्त

निवडणूक जिंकल्यास शरद पवारांच्या विधानसभेतील सर्व पदवीधरांचे लग्न लावून देण्याचे आश्वासन या उमेदवाराने दिले

हारिस रऊफने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास

Gold Silver Price Today सोन्या-चांदीच्या भावात वाढ ! आजचे नवीनतम दर जाणून घ्या

Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही

पुढील लेख
Show comments