Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तात्काळ कर्ज वाटप करावे नाहीतर कारवाई करणार

Webdunia
बुधवार, 19 जून 2019 (09:58 IST)
जिल्ह्याला यावर्षी खरीप हंगामाचे 2161 कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यात आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 66 टक्के कर्ज वाटप केले आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँका यात माघारल्या असून त्याचे कर्ज वाटप केवळ 16 टक्के आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज वाटपाची आपली प्रगती तात्काळ सुधरवावी. त्यासाठी शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक न करता बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सक्त सुचना यवतमाळ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कर्ज वाटपाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे, यांच्यासह बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. खरीप हंगामाला सुरवात होताच शेतकरी पीक कर्जासाठी बँकांकडे धाव घेतो, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले. कर्जवाटपाबाबत बँकेच्या अधिका-यांनी संवेदनशीलपणे काम करावे. आतापर्यंत जिल्ह्यात 29 टक्के कर्जवाटप झाले आहे. गतवर्षी या वेळेसपर्यंत 19 टक्के कर्ज वाटप करण्यात आले होते. गतवर्षीपेक्षा हा आकडा 10 टक्क्यांनी जास्त असला तरी सर्व पात्र शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बँकांची आहे. त्यामुळे बँकांनी गांर्भियपणे काम करावे. मंडळ स्तरावर अर्ज द्या कर्ज द्या या मेळाव्याचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांनी उपस्थित राहून कर्ज वाटप मेळाव्याच्या लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. तसेच ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटपात दिगंगाई करेल किंवा विनाकारण त्रास देईल, अशा बँकांवर कडक कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी खडसावले. 

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments