Marathi Biodata Maker

नव्या राजधानी एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर

Webdunia
बुधवार, 16 जानेवारी 2019 (17:45 IST)
नवी दिल्ली आणि मुंबई या दोन्ही महानगरांना जोडणारी आणखी एक राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणार असून, कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाँसी आणि आग्रा कॅंटोन्मेटमार्गे दिल्लीला जाणार आहे. 
 
नवी राजधानी एक्स्प्रेस दर बुधवारी आणि शनिवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटेल. तर नवी दिल्ली स्थानकावरून ही गाडी गुरुवारी आणि रविवारी सुटेल. दिल्ली ते मुंबई हे अंतर ही गाडी २० तासांमध्येच पूर्ण करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी दुपारी २.२० मिनिटांनी सुटेल. 
 
दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२० मिनिटांनी ती दिल्लीला पोहोचेल. दिल्लीहून हजरत निजामुद्दीन स्थानकावरून ही गाडी ३.४५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचेल. दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या गाड्या कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाँसी आणि आगरा कॅंटोन्मेट या स्थानकांवर थांबेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

Bank Holidays in February: फेब्रुवारी महिन्यांत बँका एकूण 9 दिवस बंद राहणार

बजेटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांचा निवडणूक प्रचार स्थगित करण्याचा निर्णय

समृद्धी एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, ठाण्यातील आई व मुलाचा दुर्देवी मृत्यू

अर्थसंकल्पात आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवली, परदेशातील शिक्षण स्वस्त झाले

पुढील लेख
Show comments