Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भटक्या कुत्र्यांचा त्रास मुंबईत रेबीजवरील लसीचा तुटवडा

Webdunia
गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (10:19 IST)
मुंबई शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांचे नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले असून, मागच्या १५ दिवसांमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले अनेक रुग्ण रेबीज प्रेरोधक लसीकरणासाठी पालिकेच्या रूग्णालयात येत आहेत. उपनगरातील पालिकेच्या रूग्णालयात देण्यात येणाऱ्या रेबीजवरील लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने केईएम हॉस्पिटलवर या रुग्णांचा ताण दिसू लागला आहे. आधी काही दिवस या लसीचा तुटवडा होता, मात्र आता हि लस पालिकेच्या रूग्णालयात पूर्ववत करण्यात आली असल्याचे पालिका आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मुंबई उपनगरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांच्या संख्येत अचानक वाढ दिसून येतेय. या साठी देण्यात येणाऱ्या रेबीज लसीचा उपनगरातील हॉस्पिटल मध्ये तुटवडा असल्यामुळे या रुग्णांना परळच्या केईएम रूग्णालयात पाठविले जातय. खाजगी रुग्णालयात हि लस किंमत महाग असल्याने नागरिकांना ती परवडत नसल्याने केईएम रूग्णालयात येणाऱ्या रुग्नांच्या संख्येत वाढ होतेय. दिवसाला कुत्रे चावल्याची सरासरी १० ते १२ पर्यंत असून, त्यात वाढच होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पश्चिम उपनगरात हे प्रमाण जास्त असल्याचे होणाऱ्या नोंदणीमधून समोर आले आहे. त्यामुळे रस्त्याने चालताना काळजी घेणे आणि भटके कुत्रे असतील तर त्वरित मनपाला कळविणे हाच एक प्राथमिक उपाय समोर येतो आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

LIVE: विरोधकांचा संविधान आणि लोकशाहीवर विश्वास नाही,फडणवीस म्हणाले

विरोधकांचा संविधान आणि लोकशाहीवर विश्वास नाही,फडणवीस म्हणाले

एअर इंडियाचे विमान तासनतास धावपट्टीवर उभे प्रवाशांना प्रचंड त्रास झाला व्हिडीओ समोर आले

एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सर्वात भ्रष्ट नेत्यांमध्ये असल्याचा संजय राऊत यांचा दावा

आधार अपडेट मोफत करा, या तारखेपर्यंत कोणतेही शुल्क लागणार नाही

पुढील लेख
Show comments