Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लावणीसम्राज्ञी शांताबाई लोंढे कोपरगावकरच्या मदतीसाठी महिला आयोगाकडून दखल

Webdunia
रविवार, 25 जून 2023 (12:36 IST)
ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शांताबाई लोंढे कोपरगावकर यांचा मदतीसाठी अनेक हात धावून आले. शांताबाई यांचा एक व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हे समजतातच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मदतीसाठी पुढाकार घेत. त्यांची भेट घेतली आणि त्यांना आर्थिक मदत करत वस्त्र भेट दिली. त्यांना श्री साईबाबांचे दर्शन करवून त्यांची सध्या राहण्याची सोया द्वारकामाई वृद्धाश्रमात करून आरोग्य उपचार व्यवस्था करून दिली. त्यांच्या सारख्या वयोवृद्ध कलावंतांना सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन कोल्हे यांनी दिले. शांताबाई या प्रसंगी म्हणाल्या, जरी मी आज वयोवृद्ध झाले आहे तरी माझी कला अजून तरुणच आहे. 

शांताबाई यांची मदत करण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत माहिती दिली. त्या म्हणाल्या ज्येष्ठ कलावंत शांताबाई कोपरगावकर यांच्या वर उपासमारीची वेळ आहे आहे अशी माहिती सोशलमिडीयाच्या माध्यमातून मिळाल्यावर महिला आयोगाच्या वतीने तातडीने जिल्हा महिला बालविकास अधिकारी अहमदनगर यांच्याशी सम्पर्क करून शांताबाई यांना मदत पुरवण्यात आली. 
<

तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर या ज्येष्ठ मराठी कलाकारावर उतारवयात दयनीय अवस्थेत राहण्याची वेळ आली आहे, अशा आशयाच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या आहेत. आयोगाच्या वतीने तातडीने जिल्हा महिला बालविकास अधिकारी अहमदनगर यांना संपर्क करण्यात आला आहे. सध्या शांताबाई नगरच्या एका…

— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 24, 2023 >
सध्या नगरच्या एका रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्या रुग्णालयात आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर महिला बाल विकास विभागामार्फत वृद्धाश्रमात त्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हा महिला बालविकास अहमदनगरला दिल्या आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

मुलीच्या भावाने केले प्रियकराचे निर्घृण खून

कांतारा चॅप्टर 1 च्या स्टार कास्टच्या बसचा अपघात,अनेक जण गंभीर जखमी

भारतीय तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई, अंदमानच्या समुद्रामधून 5 टन ड्रग्ज जप्त

LIVE: महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा

निवडणूक निकालानंतर सेन्सेक्स 1290 अंकांनी वधारला, तर निफ्टीने 24300 चा टप्पा पार केला

पुढील लेख
Show comments