Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बीफ नेत असल्याच्या संशयावरून मुस्लीम वृद्धाला धुळे-मुंबई ट्रेनमध्ये बेदम मारहाण, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Webdunia
रविवार, 1 सप्टेंबर 2024 (10:54 IST)
महाराष्ट्रातील इगतपुरीजवळ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून एका वृद्ध मुस्लिम व्यक्तीला सहप्रवाशांनी मारहाण केली.या कथित घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर जीआरपी (शासकीय रेल्वे पोलीस) ने त्याची चौकशी सुरू केली आहे.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डझनभर लोक ट्रेनमध्ये एका व्यक्तीवर हल्ला आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत.
 
जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील अश्रफ अली सय्यद हुसेन हे कल्याण येथील आपल्या मुलीच्या घरी जात होते. दरम्यान, इगतपुरीजवळ ते गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून सहप्रवाशांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यांना प्रचंड शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणाचा जो व्हीडिओ व्हायरल झाला आहे, त्यात त्यांचे कपडे फाडल्याचं दिसत आहे.त्या व्हीडिओत असं दिसत आहे की, तोंडाला रुमाल बांधलेला एक हल्लेखोर वारंवार अश्रफ अली सय्यद हुसेन यांना मारहाण करत आहे.

त्यांच्या समोर बसलेला आणखीन एक हल्लेखोर हा सगळा प्रकार मोबाईलवर शूट करत आहे आणि त्या डब्यातील तरुण बघ्यांच्या गर्दीने 72 वर्षांच्या अश्रफ अली सय्यद हुसेन यांना घेरलं आहे.ठाणे रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे-सीएसएमटी एक्सप्रेसमध्ये 28 ऑगस्ट 2024 रोजी हा प्रकार घडला असून, या प्रकरणात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
यासंदर्भात रेल्वे पोलिसांनी निवेदन जारी केलं आहे. त्यातील माहितीनुसार, जळगावचे रहिवासी असणारे अश्रफ अली सय्यद हुसेन हे मुंबईजवळच्या कल्याण येथे राहणाऱ्या त्यांच्या मुलीकडे जात होते. प्रवासादरम्यान इगतपुरी स्थानकाजवळ त्यांचा डब्यातील इतर प्रवाशांशी वाद झाला.या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ यांनी अश्रफ अली सय्यद हुसेन यांच्या घरी जाऊन रीतसर तक्रार नोंदवून घेतली.

आतापर्यंत तिघेजण ताब्यात
याप्रकरणी तक्रारदार हाजी अश्रफ व त्यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे एकूण पाच ते सहा संशयितांची ओळख पटवण्यात आली आहे.

या घटनेसंदर्भात बोलताना ठाणे मध्य रेल्वेचे उपयुक्त मनोज नाना पाटील यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "सुरुवातीला बसण्याच्या जागेवरून हा वाद सुरु झाला आणि नंतर हा प्रकार घडला. यासाठी मारहाण, दंगल घडवणे, धमकी देणे, प्रवाशांना रेल्वेतून उतरू न देणे अशा तरतुदी आहेत. त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केला आहे. आम्ही तक्रारदाराच्या घरी जाऊन, त्यांच्या मुलीसमोर ही तक्रार नोंदवून घेतलेली आहे.

या संपूर्ण प्रक्रियेचं व्हीडिओ शूटिंग देखील आम्ही केलेलं आहे. त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं, अगदी त्यानुसारच आम्ही तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात आम्ही तीन लोकांना ताब्यात घेतलं आहे."
पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, अश्रफ अली हे सध्या सुखरूप आहेत. या घटनेबाबत कुणीही अफवा पसरवू नयेत, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे नेते आणि माजी खासदार इम्तियाझ जलील यांनी या घटनेचा निषेध केला आहे.एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर पोस्ट करून इम्तियाझ जलील यांनी लिहिलं आहे की, "आता आपण फक्त मूक प्रेक्षक बनून राहू शकत नाही. या शक्तींचा पराभव करण्यासाठी आपण सर्व धर्मनिरपेक्ष भारतीयांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. या लोकांमध्ये किती विष पसरले आहे ते यावरून दिसत आहे. कदाचित आपल्या आजोबांच्या वयाच्या एखाद्या व्यक्तीशी असे करण्याचा विचार ते कसे करू शकतात."

जलील यांनी लिहिलं आहे की, "आता निवेदने सादर करणं आणि सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करणं पुरेसं नाही. सरकार आणि पोलीस डोळेझाक करत असतील तर समाज म्हणून आपण उभे राहून या शक्तींचा सामना केला पाहिजे. ही आता एक सामान्य गोष्ट झाली आहे आणि आम्ही भारतीय काहीही करत नाही."
रेल्वेने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, संशयितांना पोलिसांनी धुळ्यातून ताब्यात घेतलं आणि त्यांना ठाण्यात आणण्यासाठी एक पथक पाठवण्यात आले.याबाबत जीआरपी पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे.
 
तक्रार प्राप्त झाल्यानंतर जळगावमधील चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
Published By- Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments