Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एक जण ठार

Webdunia
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019 (15:59 IST)
पिंपरी-चिंचवडमधून जाणाऱ्या नाशिक- पुणे या महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा आज (बुधवार) पहाटे भीषण अपघात झाला. या घटनेत एसटी बस वाहकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत. पहाटे धुक्यांमुळे रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक न दिसल्याने, भरधाव वेगातील बस थेट ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा भीषण अपघात घडला. याप्रकरणी बस चालकाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
अंबादास दिनकर खेडकर (वय-३२) असे मृत्यू झालेल्या बस वाहकाचे नाव आहे. तर गंगाराम दिनकर सानप  असे बस चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे बस आगारातील बस (एम.एच-२० बी.एल-३४२६)  साक्रीहुन पुण्याच्या दिशेने निघाली होती.
 
दरम्यान पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर भोसरी पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव वेगात असलेली ही बस धडकली. या भीषण अपघातात बस वाहक अंबादास यांचा जागीच मृत्यू झाला तर तीन प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी बस चालकाला दोषी धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिले उत्तर

LIVE: पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

मेंढरमध्ये लष्कराचे वाहन कोसळले पाच जवानांचा मृत्यू,अनेक जवान जखमी

पुढील लेख
Show comments