Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोंदियाच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

Webdunia
रविवार, 15 सप्टेंबर 2024 (13:04 IST)
गोंदिया जिल्ह्यात बकऱ्यांची झाड्याच्या फांद्या आणायला पालेवाडा जंगल परिसरात  गेलेल्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला केला त्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वन विभागला ही माहिती गावातील काही लोकांनी दिली. 
 
सदर घटना शुक्रवारी गोंदियाच्या जामडी वनक्षेत्रातील एफडीसीएम राखीव जंगलाच्या कंपार्टमेंट क्रमांक 420 मध्ये घडली आहे. या जंगलात गुऱ्यांसाठी चारायला झाड्याच्या फांद्या आणायला गेलेला एका 44 वर्षीय व्यक्तीवर वाघाने हल्ला केला. बसंत राव ढोर असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. बसंत हे कलपथरी ता. गोरेगाव चे रहिवासी होते. 

13 सप्टेंबर रोजी बसंत हे मुंडीपार ते मुरदोली दरम्यान पालेवाडा जंगल परिसरात गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला केला ते जागीच ठार झाले. संध्याकाळ पर्यंत ते घरी परतले नाही. त्यांचे कुंटुंबीयानी त्यांचा शोध घेण्यात सुरु केले नंतर त्यांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली.

पोलिसांनी 14 सप्टेंबर रोजी त्यांना शोधत असताना त्यांचा मृतदेह पालेवाडा जंगल परिसरात आढळला. त्यांच्या मानेवर वाघाच्या दाताच्या खुणा आढळल्या.

या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली असून आजूबाजूच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वनविभाग पथकाने मोहीम राबवून वाघाला पकडण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments