Festival Posters

भंडारा जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटातील कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Webdunia
शनिवार, 1 मार्च 2025 (15:05 IST)
जानेवारी महिन्यात भंडारा येथील आयुध कारखान्यात मोठा स्फोट झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला.आज अपघाताच्या बळी झालेल्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या स्फोटात एकूण 10 जण जखमी झाले. 
भंडारा आर्डीनन्स कारखान्यातील स्फोटात जखमी झालेल्या या कर्मचाऱ्यावर महिनाभरापासून उपचार सुरु होते. आता या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 
ALSO READ: होळी आणि उन्हाळ्यात पश्चिम रेल्वे विशेष गाड्या चालवणार
या मृत्यू नंतर आता या कारखान्यात मृत्युमुखी झालेल्याची संख्या आता 9 झाली आहे.  मृतकाचे नाव जयदीप  बॅनर्जी आहे. तो गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात जीवन आणि मृत्यूशी झुंज देत होता पण अखेर तो जीवनाची लढाई हरला.
ALSO READ: शरद पवारांनी दिले निर्देश, राष्ट्रवादी-सपा नेत्यांकडे विविध विभागांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या
गेल्या महिन्यात जवाहर नगर येथील भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमधील एलटीपीई विभागात शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता मोठा स्फोट झाला होता. इमारत क्रमांक 23 मध्ये झालेल्या अपघातात 3कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि 10जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
ALSO READ: मीरा भाईंदरमध्ये डेप्युटी आरटीओची स्थापना
अपघातानंतर ढिगाऱ्याखाली गाडलेल्या 9 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आले. हा स्फोट इतका तीव्र होता की त्याचा आवाज 8 किमी अंतरापर्यंत ऐकू आला आणि 12 किमी अंतरापर्यंत कंपने जाणवली. स्फोटामुळे इमारतीचे लोखंडी आणि काँक्रीटचे अवशेष दूरवर विखुरले होते. जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आणि प्राथमिक उपचारानंतर त्यांना भंडारा येथील लक्ष्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले होते. यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती.
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?

पुणे विमानतळावर इंडिगोच्या 32 उड्डाणे रद्द, शेकडो प्रवासी अडकले

गोंदियातील गौसिया मशिदीने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली

LIVE: उरण मार्गावर अतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवांना मंजुरी देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

केंद्र सरकारने इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments