Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पायलटने केला निष्काळजीपणा, झाली हेलिकॉप्टर दुर्घटना

Webdunia
शुक्रवार, 16 जून 2017 (12:36 IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना पायलटच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा प्राथमिक अहवाल एएआयबीने दिला आहे. त्या दिवशी तापमान जास्त होतं. पण हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन होतं हे समजण्यात पायलटची चूक झाली. शिवाय उष्ण वातावरणात हेलिकॉप्टरला उड्डाण घेणं कठीण असतं. त्यामुळे अशा परिस्थितीही जास्त वजन असल्याने त्याने उड्डाण करायला टाळायला हवं होतं, परंतु पायलटने हे नियम पाळले नाहीत, असं एएआयबीने अहवालात म्हटलं आहे. हेलिपॅडच्या आजूबाजूच्या परिसरात वीजेचे खांब, तार यांसारख्या अडथळा ठरतील अशा वस्तू नसाव्यात. मात्र हा नियम पाळला नाही. लातूरमध्ये मागील महिन्यात 25 मे रोजी उड्डाणानंतर मिनिटभराच्या आतच हेलिकॉप्टर कोसळलं.  मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील सगळे जण या अपघातातून थोडक्यात बचावले.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments