Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बुलढाणा बस दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला

Webdunia
बुलढाणा बस अपघातात 25 ठार
चालक-वाहक ताब्यात
पीएम मोदींनी शोक व्यक्त केला

Buldhana Bus Accident महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा एक भीषण रस्ता अपघात झाला. बुलडाण्यात बसला लागलेल्या आगीत 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. ही बस नागपूरहून पुण्याला जात असताना वाटेत अपघात झाला.

जखमींवर बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
पोलिसांनी सांगितले की, खासगी ट्रॅव्हल्सची बस नागपूरहून पुण्याकडे जात असताना पहाटे दीडच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ दुभाजकाला धडकली. दुभाजकाला धडकल्याने बसमधील 25 प्रवासी भाजले.
 
यासोबतच या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बस चालक आणि कंडक्टरला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीएम मोदींनी शोक व्यक्त केला
या अपघाताबद्दल शोक व्यक्त करताना पीएम मोदी म्हणाले, "महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या बस अपघातामुळे खूप दुःख झाले आहे. ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आणि प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत. स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे. बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना रु. 2 लाख आणि जखमींना PMNRF कडून 50,000 रु. देण्यात येतील.
 
<

An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives in the bus mishap in Buldhana. Rs. 50,000 would be given to the injured: PM @narendramodi

— PMO India (@PMOIndia) July 1, 2023 >
बसमध्ये 33 जण होते
बुलढाणा एसपी सुनील कडासणे यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार बसचा टायर फुटल्याने बस खांबाला आणि दुभाजकाला धडकली आणि आग लागली. बसमधील 33 प्रवाशांपैकी 25 जणांचा जळून मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. उर्वरित आठ प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सर्वजण सुरक्षित आहेत.
 
मुख्यमंत्र्यांनी भरपाई जाहीर केली
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

लाल बहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याशी संबंधित मनोरंजक किस्से

उद्धव गट बीएमसी निवडणूक एकट्याने लढेल, संजय राऊतांनी केली घोषणा

९ महिने फ्रिजमध्ये बंद महिलेच्या मृतदेहामुळे खळबळ, मुलीच्या लग्नानंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावणार होता

LIVE: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात एक गूढ आजार पसरला

गूढ आजार : महाराष्ट्रात 11 गावे दहशतीत; आजारामुळे लोकांना पडत आहे टक्कल

पुढील लेख
Show comments