Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मध्यरात्री युवक युवती डान्सिंग कारमध्ये, नको त्या स्थितीत पकडले पोलिसांनी

Webdunia
मुंबई किंवा मेट्रो शहरात युवक युवती किंवा जोडपे अनेकदा डान्सिंग कार मध्ये आपली शारिरीक इच्छा पूर्ण करता. सार्वजनिक ठिकाणी तसे करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र हे लोन आता छोट्या शहरात देखील पसरले आहे. यामुळे मुला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असाच प्रकार घडला आहे अमरावती येते, पूर्ण शहरात याच कारची सद्ध्या चर्चा आहे. 
 
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात राहणारी एक युवती व अभिंयांत्रीकीचे शिक्षण पूर्ण झालेला एक युवक बडनेरा ते अकोला महामार्गावर बुधवारी (दि. ११) मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास (डान्सिंग) कारमध्ये आक्षेपार्ह स्थितीत पोलिसांना सापडले. बडनेरा पोलिसांनी या दोघांनाही ठाण्यात आणून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली होती.
 
अमरावती येथील असलेल्या बडनेरा ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी मध्यरात्री ठाण्याच्या हद्दीत नेहमी प्रमाणे गस्तीवर होते. हे पथक जेव्हा अकोला महामार्गाने चेकिंग करत जात होते तेव्हा त्यांना बडनेरापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर कार रस्त्याच्या अगदी कडेला उभी दिसली, मात्र ही कार जोर जोरात हालत असल्याने पोलिसांना संशय आला होता, तेव्हा पोलिसांनी या 'डान्सिंग' कारजवळ जाऊन त्यामध्ये असलेल्यांना आवाज दिला. मात्र कोणताही प्रतिसाद आला नाही आणि कारमधील लाईट देखील बंद होता. तेव्हा काच वाजवून पोलिसांनी कोण आहे असे विचारले असता आतमधील मुलानं आवाज न देता कारचा काच न उघडता काही कार सुरू करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी काही अंतरावरच कार पकडली आणि त्यावेळी कारमध्ये युवक व युवती आक्षेपार्ह नको त्या स्थितीत पोलिसांना आढळून आले आहे. 
 
तेव्हा पोलिसांनी चौकशी केली असता युवक इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेला आहे. तर तो बडनेराचा रहिवासी आहे तर युवती जिल्ह्यातीलच एका गावातील असून ती शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. पोलिसांनी त्या दोघांना पकडले तेव्हा तिने शहरात कार्यरत लिस उपायुक्तांना फोन केला आणि  कारवाई कसकाय आणि कशी करता, असा प्रश्नच विचारला बडनेरा पोलिसांनी दोघांनाही ठाण्यात आणून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. दरम्यान, 'पीके' चित्रपटफेम डान्सिंग कारप्रमाणे या अमरावती शहरातील डान्सिंग कारची चर्चा शहरात होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

मोठी बातमी! शपथविधीची तारीख उघड! मुख्यमंत्र्यांचे नावही आली आले

रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या 2 मजुरांचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

LIVE: भाजपची तयारी जोरात, हे पाच प्रमुख चेहरे मंत्रिमंडळात राहणार!

भाजपची तयारी जोरात, हे पाच प्रमुख चेहरे मंत्रिमंडळात राहणार!

गोंदियात शिवशाही बस उलटून 11 प्रवाशांचा मृत्यू, तर 23 जखमी

पुढील लेख
Show comments