Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भोंग्यांवरुन नाशिक मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस

Webdunia
बुधवार, 6 एप्रिल 2022 (21:34 IST)
नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शहर पोलिसांनी नोटिस बजावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या वक्तव्याची दखल नाशिक शहर पोलिसांनी घेतली आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज म्हणाले होते की, मशिदींवरील भोंगे हे बंद करायला हवेत. यासंदर्भात उच्च न्यायालयानेही आदेश दिले आहेत. हे भोंगे काढले नाहीत तर मशिंदींसमोर हनुमान चालिसाचे स्पीकर मोठ्याने लावले जातील, असे राज यांनी म्हटले आहे. त्यामुळेच मुंबईत काही ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांनी हनुमान चालिसाचे भोंगे लावले. नाशकातही अशा पद्धतीने भोंगे लावले जाण्याची शक्यता आहे. यामुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. याचीच दखल घेत अंबड पोलिसांनी मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर, शहर संघटक अर्जुन वेताळ, महिला शहराध्यक्ष अर्चना पाटील, मनविसे शहराध्यक्ष संदेश जगताप आदींना नोटीस बजावली आहे. शहराच्या कुठल्याही भागात अशा प्रकारे भोंगे लावू नयेत. ते लावण्याच आले तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: मतदान फक्त अरविंद केजरीवाल यांनाच द्यायला हवे- संजय राऊत

'मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मुलीची काळजी, पण मराठा मुलांची का नाही?', जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

महाकुंभ : स्नान केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले गंगा मातेचा आशीर्वाद मिळाल्याने शांती आणि समाधान मिळाले

नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंना पाठिंबा देणे महागात पडले, देहू येथील कीर्तन कार्यक्रम रद्द

फडणवीस सरकारने 13 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, राज्यपालांचे सचिवही बदलले

पुढील लेख
Show comments