Dharma Sangrah

प्रविण दरेकर यांची शिवसेनेवर सडकून टीका

Webdunia
मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (10:16 IST)
शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. त्यावरुन भाजपाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.
 
“शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचं विधान आश्चर्यकारक आहेच, परंतु शिवसेनेचं सत्तेनंतरच बदलतं स्वरूप स्पष्ट करणारं आहे. कहर म्हणजे त्यांनी बाळासाहेबांचा दाखला दिला आहे, बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील परंतु त्यांची पालखी उचलण्याचं कधी बोलले नाही तर त्यांनी त्यांच्या आचार विचारावर टीकाच केली” असे प्रविण दरेकर म्हणाले.
 
“सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचे पांडुरंग सकपाळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. मातोश्रीत नमाज पठण केल्याचं मोठं विधान त्यांनी केलं. पांडुरंग सकपाळ हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत आणि म्हणून संजय राऊत यांच्याकडून सत्ता टिकवण्यासाठी  शिवसेनेच्या मूळ आचार विचाराला नेतृत्वाला तिलांजली देणारी वाटचाल येथे सुरु आहे” अशी टीका दरेकर यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

LIVE: संजय राऊत आता उद्धव गटाचे प्रमुख-शिवसेना नेते शिरसाट

ईडीने कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीतील २१ ठिकाणी छापे टाकले, क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक उघडकीस

Flashback : २०२५ मधील टॉप न्यूजमेकर्स; वेलनेसची एक नवीन लाट आणि इंडस्ट्रीला हादरवून टाकणारे शानदार पुनरागमन

आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा कृष्णप्पा गौतम सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला

नितीन गडकरी आयआयटी मुंबई येथे म्हणाले- ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसाठी ज्ञान हे सर्वात शक्तिशाली शस्त्र

पुढील लेख
Show comments