Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठ्याचे योग्य नियोजन

Webdunia
शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (22:46 IST)
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
मेडिकल ऑक्सिजनचे समप्रमाणात वितरण
अन्न व औषध प्रशासन ऑक्सिजन पुरवठ्याचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादक व जिल्ह्यांना नियमितपणे देत असून दिनांक-२९.४.२०२१ साठी १६३६ टनाचे विवरणपत्र देण्यात आलेले आहे. याप्रमाणे वितरण केल्या जाण्यासाठी प्रशासनाद्वारे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या आयनॉक्स इंडिया, लींडे, एअर लिक्विड, टायो निप्पॉन, जे एस डब्ल्यू या पाच प्रमुख कंपन्या आहेत. याव्यतिरिक्त देखील अनेक छोटे उत्पादक आहेत त्यांचे देखील उत्पादन वाढले आहे या सर्व उत्पादकांचे मिळून सुमारे १२७० टन इतके ऑक्सिजन उत्पादन रोज होत आहे.
केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी त्यांचे पत्र दि. २४ एप्रिल, २०२१ द्वारा १७८४ टन ऑक्सिजन कोटा महाराष्ट्रासाठी निश्चित केला आहे. त्यात राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश आहे.
राज्यात सध्या प्रामुख्याने छत्तीसगड, कर्नाटका व गुजरात राज्यांमधून सुद्धा साधारणत: २०० ते २५० टन ऑक्सिजन दररोज प्राप्त होत आहे. विशाखापट्टणम येथून ७ टँकर घेऊन निघालेल्या विशेष रेल्वे व्दारा दि. २४ एप्रिल, २०२१ रोजी १०५ टन ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाला.
राज्यात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी असलेल्या टँकरची कमतरता लक्षात घेता नायट्रोजनसाठी असलेल्या टँकर यांचे ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतर करणे सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत ६८० टन ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे आणि अजून ३५० ते ४०० टन वाहन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दिनांक- २७ एप्रिल, २०२१ रोजी राज्यात एकूण १५५६ टन ऑक्सिजनचे वितरण झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाद्वारे व शासनाद्वारा या कामी नेमलेल्या नोडल ऑफिसर्स द्वारा राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.
 
रेमडेसिवीरचा साठा वितरणासाठी उपलब्ध
रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन मे.सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज व जुबिलंट या औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येते. राज्यात मे. सिप्ला लि. या उत्पादकाचे उत्पादन होते.
वरील उत्पादकांच्या प्रामुख्याने भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून या औषधाचा पुरवठा करण्यात येतो. केंद्र शासनाचे पत्र दिनांक २४/०४/२०२१ अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी वरील सात उत्पादक मिळून एकूण ४,३५,००० रेमडेसिवीरचा साठा दिनांक- २१/०४/२०२१ ते ३०/०४/२०२१ या कालावधीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
त्यानुसार दि.२१/०१/२०२१ ते २८/०४/२०२१ अखेर पर्यन्त २,९८,०२४ इतका साठा खाजगी व शासकीय रूग्णालयांना करण्यात आला आहे. पुढील कालावधीत उर्वरित साठा प्राप्त होणे अपेक्षित आहे. दिनांक- २८/०४/२०२१ रोजी राज्यात २८९४५ इतका साठा वितरीत झाला आहे. दिनांक- २९/०४/२०२१ रोजीच्या वितरणासाठी अंदाजे ३०,००० इतका साठा वितरणासाठी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. अशी माहिती डॉ. शिंगणे यांनी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

मनू भाकरला खेलरत्न मिळू शकतो,अंतिम यादी निश्चित झालेली नाही- क्रीडा मंत्रालय

IND vs AUS: शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही, पुढील दोन कसोटींसाठी अनफिट घोषित

दाऊद इब्राहिमच्या भावावर मोठी कारवाई, ईडीने मुंबईतील फ्लॅट ताब्यात घेतला

जयपूर टँकर अपघातात जखमी दोघांचा मृत्यू, मृतांची संख्या 15 वर पोहोचली

LIVE: एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना भाजपने फसवले! शिवसेना संतप्त

पुढील लेख
Show comments