Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे-मुंबई मार्गावर धावणारी सिंहगड एक्सप्रेस सुरु

Webdunia
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (21:18 IST)
देशात कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढत असल्याने देशातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक मार्गावरील रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. परंतु पुणे-मुंबई मार्गावर धावणारी सिंहगड एक्सप्रेस सुरु करण्यात आली नव्हती. त्यामुळे ही रेल्वे सुरु करण्याची मागणी होत होती. अखेर सोमवार (दि.18) पासून पुणे-मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेस  सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गेल्या 19 महिन्यापासून ही गाडी बंद होती.
 
पुण्यावरुन ही रेल्वेगाडी (क्र. 01009) सकाळी 6 वाजून 05 मिनिटांनी निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर या स्थानकांवर थांबेल.
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन ही गाडी (क्र.01010) सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी निघेल. रात्री 10 वाजता पुणे स्टेशन  येथे पोहचेल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही रेल्वे गाडी पुन्हा सुरु केल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत  आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

भारतीय क्रिकेटपटूचे पुण्यात आकस्मिक निधन, कारण ऐकून मित्रांना धक्का बसला

बाबा वांगाची 3 भीतीदायक भविष्यवाणी व्हायरल!

सीमेवरून माघार घेण्याच्या करारावर चिनी लष्कराचे हे मोठे विधान-राजनाथ सिंह

कर्करोग बरा करण्याचा उपाय सांगून सिद्धू अडकले , 850 कोटींचा केस दाखल

EPFO 3.0 मध्ये मोठे बदल होणार आहेत, तुम्ही ATM मधून PF चे पैसे काढू शकाल

पुढील लेख