Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिलांनी केली 'पुष्पा'ची धुलाई

Webdunia
सोमवार, 4 एप्रिल 2022 (15:07 IST)
बदलापूरच्या पश्चिम भागातील आशीर्वाद हॉस्पिटल समोर अनामिका नोवेल्टी नावाचं स्टेशनरी शॉप आहे. या दुकानात आलेल्या महिलांकडून दुकानदार पुष्पराज परिहार काही तरी कारण काढून मोबाईल नंबर घ्यायचा आणि नंबर सेव्ह करून ठेवायचा. नंतर त्यांना व्हिडिओ कॉल करून त्रास देत होता.  तेव्हा दुकानदाराला महिलांनी चांगलाच धडा शिकवला. दुकानात घुसून महिलांना या दुकानदाराला चोप दिला.
 
त्यानंतर या महिलांना व्हिडिओ कॉल करून पुष्पराज त्रास द्यायचा. यासंदर्भात अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. याची दखल घेत स्थानिक महिला एकत्र आल्या आणि त्यांनी रविवारी संध्याकाळी पुष्पराजच्या दुकानात जाऊन त्याला जाब विचारला. सुरुवातीला पुष्पराजने महिलांना उडवाउडवीची उत्तरं दिली.
 
त्यामुळे संतापलेल्या महिलांना पुष्पराजला चांगलाच चोप दिला. तसंच त्याला माफी मागायलाही भाग पाडलं. यानंतर महिलांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी पुष्पराज याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.  

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments