Festival Posters

मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी

वेबदुनिया न्यूज टीम
बुधवार, 6 मे 2026 (13:15 IST)
महाराष्ट्रात हवामानाची दोन टोकाची रूपे पाहायला मिळत आहे. कोकणात उष्णतेची लाट असताना, दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाने हजेरी लावली आहे.
ALSO READ: मुंबई: निवृत्त बँक व्यवस्थापकाला ५४ दिवस 'डिजिटल अटकेत' ठेऊन लाखो रुपये लुटले
मराठवाडामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाने सुरुवात केली आहे. काही ठिकाणी हलकी गारपीट झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे.

तसेच विदर्भात गोंदिया मध्ये व जिल्ह्याच्या आसपासच्या भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागली आहे.

हा पाऊस उकाड्यापासून दिलासा देणारा असला, तरी शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे: आंबा, लिंबू आणि संत्रा बागांना या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर काढणीला आलेल्या उन्हाळी मूग, बाजरी आणि भुईमुगाच्या पिकांचे नुकसान होऊ शकते.
ALSO READ: सिंधुदुर्ग : शाळेतील ध्वजारोहण सोहळ्यानंतर महिला शिक्षिका बेपत्ता
हवामान खात्यानुसार, पुढील २४ ते ४८ तास मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत हीच स्थिती कायम राहू शकते.
ALSO READ: रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर (टार बॉल्स) डांबराच्या गोळ्यांचे संकट; समुद्रकिनारे विषारी झाले
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपनमध्ये विजयाने सुरुवात केली

बंगळूरु मधील युगांडाच्या महिलेत इबोलाची लक्षणे, रुग्णालयात दाखल

जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी विशेष

पेट्रोलचा खर्च संपेल, एमजी कॉमेट ईव्ही खरेदी करण्यापूर्वी या ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

LIVE: 'हा' मोठा पक्ष शिंदे सेनेत विलीन होणार!

पुढील लेख
Show comments