Dharma Sangrah

कसं असेल महाराष्ट्रातील हवामान

Webdunia
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (17:44 IST)
राज्यात सर्वदूर कोरडं हवामान राहणार आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे भारतात मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत.
 
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रभावामुळे दक्षिण भारत आणि ईशान्यकडील काही राज्यात अद्याप मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. पुढील एक ते दोन दिवसांत येथून मान्सून पूर्णपणे परतण्याची शक्यता आहे.
 
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भाग वगळता महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे परतला आहे. स्थिती बिकट आजपासून पुढील पाच दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे.
 
भारतीय हवामान खात्याने राज्यात सर्वदूर कोणताही इशारा दिला नाही. मान्सून परत जाताच राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात किंचितशी वाढ झाली आहे.
 
तर पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. दुसरीकडे, दक्षिण भारत आणि ईशान्यकडील राज्यात आज अनेक ठिकाणी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. येत्या चोवीस तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
 
खरंतर, सध्या बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा परिसरावर तयार झालेलं हवेच्या कमी दाब क्षेत्र बिहारकडे सरकलं आहे. तर उत्तर प्रदेश आणि आसपासच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे उत्तर भारतातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

'पवारांना त्यांचे शिष्य सल्ला देत आहे,' राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या अटकळांवर संजय राऊत यांचा कडक उपहास

NCP party merger 'शोकसभेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणावर बोलतील; आमदार रोहित यांचे विधान

९ फेब्रुवारी रोजी पुण्याला नवीन महापौर मिळणार; अजित पवार यांच्या निधनामुळे कोणतेही उत्सव होणार नाही

LIVE: रोहित पवार यांनी १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे आवाहन केले

मेघालयातील "बेकायदेशीर" कोळसा खाणीत स्फोट, १६ कामगारांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments