suvichar

पावसाचा जोर वाढणार, पुणे वेधशाळेचा अंदाज

Webdunia
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात २६ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान, कोकण आणि गोव्यात पुढील चार ते पाच दिवसात अतिवृष्टी होईल. तसेच तर येत्या ४८ तासात मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. रत्नागिरी गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे.
 
दुसरीकडे विजांच्या कडकडाटासह दक्षिण रत्नागिरीसह गुहागर, लांजा, राजापूर, दापोलीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे दक्षिण रत्नागिरीतले जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूर तालुक्यात सर्वाधिक, तब्बल २५१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात २१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीच्या बाजारपेठांमध्ये पाणी साचलं होतं. मिरजोळे पाटीलवाडी इथं पुलावरून पाणी गेल्याने १६ गावांचा संपर्क तुटला होता. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिरात चोरी

अभिषेक शर्माने एका मोठ्या शतकासह ऑरेंज कॅप पटकावली

Volleyball Federation of India राजकारणामुळे भारतीय व्हॉलीबॉल महासंघाची मान्यता रद्द

माकडाने तीन महिन्यांच्या चिमुकलीला दोन तास कैदेत ठेवले, त्यानंतर तिची धक्कादायक सुटका

लग्नासाठी तरुणाने, पोलीस भरतीची खोटी बातमी पसरवली आणि स्वतःचे पोस्टर्स लावले; गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments