Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचं राज ठाकरे यांनी समर्थन केलं

Webdunia
मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (15:36 IST)
भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समर्थन केलं आहे. मुंबईमध्ये पक्षाचा पदाधिकाऱ्यासंमोर दिलेल्या भाषणामध्ये राज यांनी भारतामधून फरार झालेल्या झाकीर नाईकचा उल्लेख करत नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं आहे.
 
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना, “आजपर्यंत आपण जेवढी आंदोलनं केली तेवढी इतर कोणत्याही पक्षाने केलेली नाहीत,” असं म्हटलं. पुढे राज यांनी, “मशिदीवरचे भोंगे काढा भोंगे काढा किती वर्ष सुरु होतं. पण या भोंग्यांना आपण पर्याय दिला. एक तर भोंगे काढा किंवा आम्ही तिथे येऊन हनुमान चालिसा म्हणू. सगळ्यांनी भोंगे काढायला सुरुवात केली. आता मुस्लीम समाजातील अनेकजण सांगत आहेत की ते बरं वाटतं कानाला. असंख्य आंदोलनं झालेली आहेत. तुम्ही हे लोकांना सतत सांगितलं पाहिजे. तुम्ही कसले दबून राहता?” असा सवाल केला.

पुढे याच संदर्भातून राज यांनी नुपूर शर्मांसंदर्भातील वादावर भाष्य केलं. “त्या नुपूर शर्मा बोलल्या. त्यांना काढून काय टाकलं. माफी काय मागितली सगळ्यांची. मी बाजू घेतली त्यांची. त्या स्वत:च्या मनातलं बोलत नव्हतं. जे होतं ते (बोलत होत्या)”, असं म्हणत राज यांनी नुपूर शर्मांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. तसेच पुढे राज यांनी भारतामधून फरार झालेला मुस्लिम धर्मोपदेशक आणि इस्लामिक रीसर्च फाउंडेशनचा संस्थापक झाकीर नाईकचा उल्लेख केला. “तुमचा तो नाईक कोण? झाकीर नाईक त्याची मुलाखत बघा. झाकीर नाईक तर मुस्लमान आहे. झाकीर नाईकच्या एका मुलाखतीत त्याने तेच सांगितलं आहे जे नुपूर शर्मा बोलत होती,” असंही राज भाषणामध्ये म्हणाले.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments