Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ही तर अराजकतेकडे वाटचाल : राज ठाकरे

ही तर अराजकतेकडे वाटचाल : राज ठाकरे
Webdunia
शनिवार, 13 जानेवारी 2018 (10:16 IST)

सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांवरच न्याय मागण्याची वेळ येतेय, यावरून देश किती अराजकतेकडे चालला आहे याची कल्पना येते, अशी  प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरी येथे व्यक्‍त केली.

सरकार सर्वत्र नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. माध्यमेही उघडपणे बोलू शकत नाहीत. आता तर न्याय व्यवस्थेवरच नियंत्रण ठेवण्याचा सरकारकडून प्रयत्न झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जनतेच्या न्यायालयात येऊन आपली बाजू मांडल्यानंतर स्पष्ट होत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडत आहे. त्यामुळे त्या न्यायाधीशांचा किती कोंडमारा झाला असावा, याचा अंदाज येऊ शकतो, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

सरकारच्या प्रत्येक ठिकाणच्या अतिक्रमणावर बोट ठेवताना राज ठाकरे यांनी सांगितले की, ‘अडीच माणसे देश चालवत आहेत.’ ही सर्व परिस्थिती देश अराजकतेकडे वाटचाल करत असल्याचे दाखवण्यास पुरेशी आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतीलच, असेही ते यावेळी म्हणाले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभेत संघ नेत्याच्या विधानाने गोंधळ झाला

जळगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू

'रस्ते अपघातांमध्ये वाढ होण्यास अभियंते जबाबदार, आपल्याला इतर देशांकडून शिकण्याची गरज आहे म्हणाले नितीन गडकरी

राहुल गांधींनी धारावीतील चामडे उद्योगातील कामगारांना भेट दिली

LIVE: राहुल गांधींनी धारावीतील कामगारांना भेट दिली

पुढील लेख
Show comments