rashifal-2026

अखेर कदम यांनी मागितली क्षमा

Webdunia
गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (09:13 IST)
दहीहंडीच्या दिवशी मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांचा एक मराठीतला आणि एक हिंदीतला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हिंदीतल्या व्हिडिओत त्यांनी तमाम माता भगिनींचा सन्मान करतो आहे असे म्हणत ‘क्षमा’मागितली आहे. तर मराठीतल्या व्हिडिओत दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र आपल्या वक्तव्यात 'माफी' हा शब्द त्यांनी कुठेही येऊ दिलेला नाही.
 
माझे वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आले. मात्र याबाबत कोणतीही सफाई किंवा स्पष्टीकरण न देता मी दिलगिरी व्यक्त करतो असे राम कदम यांनी म्हटले आहे. तर हिंदीमध्ये त्यांनी क्षमा या शब्दाचा वापर केला आहे. मात्र जे बोललो ती माझी चूक आहे मला माफ करा असे राम कदम या दोन्ही व्हिडिओंमध्ये एकदाही म्हटलेले नाहीत. 
 
याआधी राम कदम यांचे वादग्रस्त वक्तव्य जेव्हा समोर आले त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील तमाम महिलांची माफी मागावी अशी एकमुखी मागणी होते आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

कोण आहे भाजपचे सर्वात तरुण अध्यक्ष नितीन नबीन, त्यांच्यासमोर कोणती आव्हाने ?

BJP Shiv Sena Mayor Dispute महापौरांवर महायुतीत महाभारत! बीएमसी, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिंद सेना आमनेसामने

हत्या की आत्महत्या? एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह सापडले, सर्वांच्या अंगावर गोळ्यांच्या खुणा

मुंबई लोकल ट्रेनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; भारतीय महिला खेळाडूंच्या फोटोंनी लोकांची मने जिंकली

LIVE: भारतीय जनता पक्षाला मुंबई महापौरपद देण्यात यावे- रामदास आठवले

पुढील लेख
Show comments