Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिपयाने केले दिव्यांग मुलीचे लैंगिक शोषण, नराधमास अटक

Webdunia
संतापजनक प्रकार सातपूर परीसरात घडला आहे. एका 14 वर्षीय दिव्यांग मुलीवर 52 वर्षीय शिपायाने लैंगिक अत्याचार केला आहे.  शासकीय अंध शाळेत केअर टेकरने मुलांना दारूच्या नशेत मारहाण केल्याची घटना नाशिकमध्ये ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चॉकलेटचे आमिष दाखवून वसतीगृहामध्ये शिपाई पदावर कार्यरत असलेले बाळू धनवटे हे पीडित मुलीवर वस्तीगृहाच्याच शौचालयात वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले आहेत. हे सर्व  मागील चार महिन्यांपासून हा  सुरु होते.
 
या नराधम वॉचमन ने मुलीला धमकावले होते,  कोणाकडे वाच्यता केल्यास चाकूने मारून असा दम भरला होता. मात्र सर्व प्रकार असह्य झाला आणि कंटाळून पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या काही मैत्रिणींना सांगत ऑडिओ रेकॉर्ड करून एका शिक्षिकेला सांगितला आणि शाळेसह हॉस्टेलमध्ये एकच खळबळ उडाली. मुलीने सातपूर येथे फिर्याद दिली असून  शिपाई बाळू धनवटेवर बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून  त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या मुलींच्या वसतीगृहात सर्व महिला मुली असून फक्त हाच एक पुरुष होता जो रखवालदार होता. समाजातील या विशेष मुली सर्वसामान्य मुलींप्रमाणेच जगण्याचा, समाजात वावरण्याचा प्रयत्न करत असतानाच बाळू धनवटे सारखे नराधम त्यांना लक्ष्य करत आहेत. या घटनेमुळे वसतीगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सातपूर पोलिस मात्र या प्रकरणावर न थांबता इतर मुलींची चौकशी करणार असून असा प्रकार अजून कोणासोबत झाला नाही ना हे तपासून पाहत आहे.

संबंधित माहिती

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पुढील लेख
Show comments