Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा, राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत कोणत्या १५ प्रस्तावांना मंजुरी मिळाली

Webdunia
गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (21:27 IST)
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे मंत्री आणि प्रधान सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. त्यातील १५ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे
 
१. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठीचे गौण खनिजाबाबत दंडनीय कारवाईचे आदेश रद्द
(सार्वजनिक बांधकाम विभाग)
२. कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मुल्याधारित, मालमत्ता दर न बदलण्याचा निर्णय
(नगर विकास विभाग)
३. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नाथवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १०७.९९ कोटी खर्चास सुधारित मान्यता. ५०० हेक्टर जमिनीला फायदा
(जलसंपदा विभाग)
४. राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविले. आता मिळणार दरमहा २० हजार रुपये निवृत्ती वेतन
भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना लाभ मिळणार
(सामान्य प्रशासन विभाग)
५. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे मा. मुख्य न्यायमुर्ती यांचे अतिरिक्त सचिव ही पदे निर्माण करण्यास मान्यता.
(विधि व न्याय विभाग)
६. नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सुविधा उपलब्ध करणार. २ हजार ५८५ लाखाचा निधी देण्याचा निर्णय
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
७. अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ .
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
८. ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. अधिसंख्य पदांवर सामावून घेणार
(पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग)
९. “जेएसपीएम विद्यापीठ, पुणे” या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास मान्यता
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
१०. राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु , प्र कुलगुरु यांची निवड पद्धती आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विहीत केल्याप्रमाणे होणार. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या विविध कलमांमध्ये सुधारणा करणार
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
११. नवीन महाविद्यालयांच्या परवानगीसाठी आता १५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येईल
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
१२. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी ३५ हजार ६२९ कोटी रुपये कर्जरुपाने उभारण्यास मंजूरी. भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार.
(सार्वजनिक बांधकाम विभाग)
१३. एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या . ९ सप्टेंबर २०२० नंतरच्या निवड प्रक्रियेस मान्यता
(सामान्य प्रशासन विभाग)
१४. आता मतदार यादीत नाव नसलेले शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतात. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार (पणन विभाग)
१५. आता पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस- आयओएन, व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेणार. भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा. (सामान्य प्रशासन विभाग)

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

LIVE: धारावी प्रकल्पाच्या टिप्पणी वरून फडणवीस यांची राहुल यांच्यावर टीका

भाजपने जतमधून गोपीचंद पडळकर यांना रिंगणात उतरवले

धारावी प्रकल्पाच्या टिप्पणी वरून फडणवीस यांची राहुल यांच्यावर टीका

महाराष्ट्रात शरद पवार राहुल गांधी,यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी

शरद पवारांच्या पॉवर पॉलिटिक्सचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत किती प्रभाव?

पुढील लेख
Show comments