Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी परत 18 जुलैला परिक्षा

Webdunia
मंगळवार, 13 जून 2017 (17:03 IST)

दहावीच्या परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी परत परिक्षा घेतली जाणार आहे. यासाठी सोमवार दि. 19 जुन पाासून पुन्हा अर्ज करता येणार असून, 18 जुलैला त्यांची परिक्षा होणार आहे. त्याचा निकाल लगेचच ऑगस्टमध्ये लागून त्यांना याच वर्षी अकरावीसाठी प्रवेश घेता येणार आहे.  त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा परिक्षेसाठी अर्ज करणे अत्यावश्यक आहे. जे विद्यार्थी एक ते दोन विषयात अनुत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश मिळत असला तरी त्यांना परिक्षा देवून ते विषय उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यामुळे एटीकेटीसह अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हा एक समर्थ पर्याय आहे. याशिवाय उत्तरपत्रिका पुर्नतपासणी, झेरॉक्स उत्तरपत्रिकांची मागणी हे पर्यायही खुले असल्याने त्यासाठी देखील विद्यार्थी तातडीने अर्ज करू शकतात.  केवळ अनुत्तीर्ण नव्हे तर सर्व विषय घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी, गुणसुधार योजनेेंतर्गत परिक्षेस पुन:श्च प्रविष्ठ होण्याची संधी सन 2008 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.  त्यानुसार मार्च 2017 मध्ये परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सर्व विषयासह प्रविष्ठ होवून जुर्ल 2017 व मार्च 2018 अशा दोन संधी उपलब्ध राहणार आहेत

.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments