Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साई भक्तांसाठी सेवा योजना राबविण्याचा संस्थानचा मानस

Webdunia
शुक्रवार, 19 मे 2017 (11:45 IST)

शेगांवच्या गजानन महाराज मंदिरात भक्तांना सेवा करता येते, त्याचप्रमाणे योजना राबविण्याचा शिर्डीच्या साई संस्थानचा मानस आहे. साईबाबांच्या मंदिरात सेवाभाव वाढवणं आणि भक्तांना सेवाभावी वागणूक मिळण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.  साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने साईबाबा संस्थानला सेवकांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. त्यामुळे संस्थाननं हा निर्णय घेतला आहे.

या योजनेसाठी 21 सदस्यांच्या गटाची स्थापना करण्यात येणार असून, त्यातील एकाची या गटाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच शिर्डीत साईंची पालखी घेऊन येणाऱ्या इच्छूक साईभक्तांनी आपल्या नावांची नोंदणी या 21 सदस्यांकडे करायची आहे. साईबाबा समाधी शताब्दी वर्षात सात दिवस साईभक्तांना साईंची सेवा करता येणार आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या भक्तांना कोणत्याही प्रकरचं मानधन मिळणार नाही.  मात्र, त्या सर्वांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था साई संस्थानच्या वतीनं करण्यात येणार आहे.  या योजनेमुळे साईबाबा समाधी शताब्दी वर्षात 10 हजार 500 साईभक्तांना सेवेची संधी मिळणार आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments