Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सावरकर वादः राहुल गांधींविरोधात आंदोलन करणारे मनसेचे नेते पोलिसांच्या ताब्यात

Webdunia
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (14:33 IST)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते शेगावमध्ये दाखल झाले आहेत.
मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे आणि नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र शेगावला जाण्यापूर्वीच या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना रोखण्यात आलं.
 
बुलढाण्यातील चिखली येथे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना रोखण्यात आल्या नंतर मनसैनिकांनी आंदोलन केले. राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणा देऊन त्यांनी कारवाईचा निषेध केला.  शेगावला जाण्यापूर्वीच रोखल्यामुळे मनसेच्या नेत्यांनी ही दडपशाही असल्याचा आरोप केला. पोलिसांनी संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांना ताब्यात घेतले. 
 
आज (18 नोव्हेंबर) राहुल गांधी यांची जाहीर सभा अकोला जिल्ह्यातील शेगावमध्ये नियोजित आहे. या सभेला विरोध या आंदोलनाच्या माध्यमातून नोंदवणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं होतं.
 
विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रजांना घाबरूनच माफी मागितली होती, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
 
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षानेही राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं स्पष्ट केलं. याबाबत विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.
 
राहुल गांधी यांची शेगावमधील सभा उधळून लावू, अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी घेतली असून काल (गुरुवारी) अनेक मनसे कार्यकर्ते मुंबईहून शेगावच्या दिशेने रवाना झाले होते.
 
मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी काल यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
 
“आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. जे करु ते लोकशाही मार्गानेच करु. पोलीस पोलिसांचं काम करतील. कायदा कायद्याचं काम करेल. आम्हाला जे करायचंय ते आम्ही करु,” असं संदीप देशपांडे यावेळी म्हणाले.
 
मनसेचे कार्यकर्ते आता शेगावमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली असून आता या प्रकरणात पुढे काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्यात ठिकठिकाणी राहुल गांधींचा निषेध
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद कोल्हापूरमध्येही उमटले आहेत.कोल्हापुरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं.
 
छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत त्यांचा निषेध नोंदवला.
 
शिंदे गटातील नेते माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
 
राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य हिंदुत्ववादी लोक कदापी खपवून घेणार नाहीत, त्यांना जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments