Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : एम.फिल., पीएच.डीच्या जागांमध्ये घट

Webdunia
गुरूवार, 27 जुलै 2017 (14:39 IST)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.फिल. व पीएच.डीच्या जागांमध्ये तब्बल 2000ने घट झाली आहे. एम.फिल ,पी.एच.डीचे प्रवेश अर्ज मिळण्यास सुरूवात झाली असून हे प्रवेश अर्ज १४ ऑगस्टपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध असणार आहेत.

यावर्षी पी.एच.डी साठी 2000 जागा तर एम.फिल.साठी 265 जागांसाठीच प्रवेश प्रक्रिया घेण्यात येणार आहे. तर मागच्यावर्षी पी.एच.डी साठी 5000 जागा होत्या आणि त्यासाठी तब्बल 13000 अर्ज आले होते. त्यामुळे पी.एच.डी. प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मोठा झगडा करावा लागणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यू.जी.सी.) निर्देशानुसार पी.एच.डी. व एम.फिल. गाइडशिपच्या नियमात बदल झाल्याने या जागांमध्ये घट झाली आहे.  एम.फिल. आणि पीएच.डी.च्या प्रवेशासाठी १० सप्टेंबर रोजी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे, त्यानंतर मुलाखत घेऊन गुणवत्ता यादीच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री! 4 डिसेंबरला होणार घोषणा

राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा महासागर, नितीन गडकरी यांचे वक्तव्य

अंडर-19 आशिया कप: भारताने जपानचा 211 धावांनी पराभव केला

लातूर: सरकारी शाळेतील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह आत्महत्या

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

पुढील लेख
Show comments