Dharma Sangrah

शाळा उघडण्याबाबत दिवाळीनंतर निर्णय होणार

Webdunia
शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (15:26 IST)
केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष उघडण्याची मुभा दिली असली, तरी महाराष्ट्रात नोव्हेंबर महिना उजाडणार  आहे. संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिल्याने दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. याबाबत चाचपणी करण्यासाठी शिक्षण विभागाने संस्थाचालक महामंडळाची बैठक घेतली होती. 
 
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता इतक्यात शाळा उघडणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संस्थाचालकांनी ऑनलाईन बैठकीत घेतली.कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही पसरत असल्याने 21 सप्टेंबरपासून मुलांना शाळेत पाठवण्यास पालकही राजी होणार नाहीत, निवासी शाळा तर कोणत्याही परिस्थितीत सुरु होता कामा नये. गेल्या वर्षीचे वेतने तर अनुदान परत गेल्याने सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता साहित्य खरेदीसाठी ते तातडीने देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.दिवाळी 13 ते 16 नोव्हेंबरदरम्यान असल्याने आणखी दोन महिने तरी विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार नाही. मात्र ऑनलाईन शिक्षण सुरुच राहणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: हवामान विभागाने आज २३ जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला

Gopal Krishna Gokhale Jayanti 2026 : गोपाल कृष्ण गोखले जयंती

अवकाळी पावसाचा तडाखा: साताऱ्यातील पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले

10th results दहावीच्या परीक्षेत मातृभाषेत मराठी विषयात ९४,५४४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले; चिंतेची बाब समोर आली

बंगालमध्ये आता खऱ्या विकासाला सुरुवात होईल! कोलकात्यात दाखल झालेल्या एकनाथ शिंदे यांनी डबल-इंजिन सरकारवर विश्वास व्यक्त केला

पुढील लेख