Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवार, उद्धव ठाकरे अन् नाना पटोले एकत्र करणार महाराष्ट्र दौरा

Webdunia
मंगळवार, 4 जुलै 2023 (21:17 IST)
मुंबई : राष्ट्रवादीतील फुटीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करणासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. यासंदर्भात नुकतीच काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीतील फुटीनंतरची रणनीती ठरवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, नसीम खान यांची उपस्थिती होती.
 
या बैठकीनंतर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते मिळून महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे निश्चित करण्यात आले. या दौ-याला उत्तर महाराष्ट्रातून लवकरच सुरुवात होणार असून लोकशाहीविरोधी भाजपला राज्यातून उखडून टाकणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाचीही बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी अभेद्य असल्याचे मान्य करण्यात आले. शरद पवार एकटे नाहीत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ते मजबूत आहेत. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. शरद पवार हे बाळासाहेब ठाकरेंसारखेच आहेत. ते कधीही स्वत:ला एकटं समजणार नाहीत, असे शिवसेनेच्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी म्हटले आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता महाविकास आघाडीचे काय होणार? या प्रश्नांचा पूर्णविराम मिळाला आहे. पण आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मविआ काय नवी रणनीती आखणार याकडे सर्वांच्या नजरा असतील.
 
आम्ही महाविकास आघाडीसोबतच – भास्कर जाधव
राज्याच्या राजकारणात ज्या घडामोडी झाल्या त्यानंतर आमच्या पक्षप्रमुखांनी सुद्धा बैठक बोलावली होती. राष्ट्रवादीमध्ये ज्या घडामोडी घडल्या आहेत त्याचा मतदारसंघांमध्ये नेमका काय परिणाम होईल याबद्दल आढावा घेण्यात आला, आम्ही महाविकास आघाडीसोबतच आहोत, असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा तापणार

मिनी मॅरेथॉन दरम्यान अचानक गोळीबार, एक जण जखमी

संसदेत धक्काबुक्कीत जखमी झालेल्या खासदारांची आज होणार चौकशी

‘अपूर्ण ज्ञान अधर्माला जन्म देते’, म्हणाले आरएसएस प्रमुख मोहन भागवत

अल्लू-अर्जुनच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत सीएम रेवंत रेड्डी यांचे वक्तव्य आले समोर

पुढील लेख
Show comments