Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद ,शरद पवारांची सरकारवर टीका

Webdunia
सोमवार, 18 डिसेंबर 2023 (08:31 IST)
खेड : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘साहेब केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. भल्या भल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे, असा इशारा शरद पवार यांनी आपल्या विरोधकांना दिला.
 
शरद पवार यांनी बैलगाडा शर्यतीचे कौतुक केले. ते म्हणाले आतापर्यंत अनेक शर्यती टीव्हीवर पाहील्या पण घाटात आल्याशिवाय डोळ्याचे पारणे फिटत नाही. त्यांनी अमोल कोल्हे यांचे देखील आभार मानले. शरद पवार म्हणाले माझी एक तक्रार आहे. सगळ्या भाषणांमध्ये मी 83 वर्षाचा झालो, 84 वर्षाचा झालो, असे म्हणतात. तुम्ही माझ काय बघितलं अजून, मी काही म्हातारा झालो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे. तुम्ही काही चिंता करु नका, असा इशारा शरद पवार यांनी विरोधकांना दिला.
 
जे काही तुमचं दुखणं आहे ते लवकरच दूर करु, यासाठी जे काही करावे लागेल, ते सर्व आपण मिळून करु. लवकरच नवा इतिहास घडवू, अशा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. सरकारमध्ये शेतकऱ्यांबाबत आस्था नाही. कांद्यासह शेतमालाला भाव नाही. कांद्याची निर्यातबंदी केली. शेतकऱ्यांवर संकट ओढण्याचे काम होत आहे. मात्र आपण एकजुटीने महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहोत, असे शरद पवार म्हणाले.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

दौंड येथे आईने केली स्वत:च्या मुलांची हत्या, पतीवर कोयत्याने हल्ला केला

ठाण्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांचा डॉक्टरवर हल्ला, गुन्हा दाखल

महाकुंभाने दिल्लीत चमत्कार दाखवला', नवनीत राणा यांचे आप वर टीकास्त्र

IND vs ENG: कटक वनडेपूर्वी भारताला आनंदाची बातमी, कोहली खेळणार हा सामना

National Games: बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनने सुवर्णपदक जिंकले, शिवा थापाला रौप्यपदक

पुढील लेख
Show comments