Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून १८ जागांवर दावा

eknath shinde
Webdunia
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (09:15 IST)
निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून १८ जागांवर दावा करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकमत झाले असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. दरम्यान, जागावाटपाची चर्चा आणि अधिकार पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्याचा प्रस्ताव या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.
 
२०१९ ला शिवसेनेने २२ जागा जिंकल्या होत्या आता १८ जागांवर उम्मेदवार तयारी सुरु करणार असून उरलेल्या ४ जागांचे भविष्य एकनाथ शिंदे  ठरवतील, असे अधिकार संसदीय दलाने त्यांना दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षातील खासदार आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. यात लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार उपस्थित होते.
 
या बैठकीत इतरही अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली असून या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विशेष समिती बनविण्याचा निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. निवडणूक काळात करण्यात येणाऱ्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेली विकासाची कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे प्रमुख उद्दिष्टे असणार आहे. त्याशिवाय मराठा आरक्षणाबाबत घेतलेला निर्णय, इतर महामंडळांची केलेली घोषणा आणि शिवडी नाव्हाशेवा सारखी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची केलेली घोषणा हे यंदाच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय यंदाच्या प्रचारात पक्षाकडून पुन्हा एकदा हिंदुत्त्वावर भर देण्याचे ठरविण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेच्या खासदारांकडून देण्यात आली आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: संग्राम थोपटे यांचा भाजप मध्ये प्रवेश

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, संग्राम थोपटे यांचा भाजप मध्ये प्रवेश

National Civil Services Day 2025 : २१ एप्रिल रोजी नागरी सेवा दिन का साजरा केला जातो, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

Boxing : ज्युनियर आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची विजयी सुरुवात

KKR vs GT:कोलकाता नाईट रायडर्स त्यांचा चौथा सामना गुजरात विरुद्ध खेळणार

पुढील लेख
Show comments