Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नियम-अटींच्या शर्तीवर जिम, शॉपिंग मॉल, स्विमिंग पूल लवकरच सुरु होणार

Webdunia
गुरूवार, 23 जुलै 2020 (15:42 IST)
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल चार महिन्यांपासून बंद असलेल्या जिम, शॉपिंग मॉल्स आणि स्विमिंग पूल सुरु करण्यास लवकरच परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबतचे संकेत दिले. त्यांनी म्हटले की, राज्य सरकार जिम, शॉपिंग मॉल आणि स्विमिंग पूल सुरु करण्याबाबत विचार करत आहे. जिम हे जनतेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे काही नियम-अटींच्या शर्तीवर स्विमिंग पूल, जिम आणि मॉल्स सुरु केले जाऊ शकतात. आरोग्य विभाग सध्या यासाठीच्या मार्गदर्शक सूचीवर काम करत असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.
 
यावेळी राजेश टोपे यांनी पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबतही भाष्य केले. आता पुण्यातही मुंबईप्रमाणे मिशन झिरो राबवण्यात येणार आहे. पंधरा मिनिटात रिपोर्ट मिळतील, अशा टेस्ट आल्या आहेत. त्याचे किट सर्व खासगी रुग्णालयांनी आपल्याकडे ठेवावेत. कोणत्याही रुग्णाला परत पाठवून दिल्याची तक्रार समोर आल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याचा इशाराही राजेश टोपे यांनी दिला. दरम्यान, बुधवारी राज्यात कोरोनाचे सर्वाधिक १०,५७६ रुग्ण आढळून आले. तर २८० जणांचा मृत्यू झाला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.६२% एवढे आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

जीएमआरटी स्थलांतरित होणार नाही,रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे संकेत

LIVE: महाराष्ट्रात दारू महागणार

सरकार रिकामी तिजोरी भरण्याचा प्रयत्नात, महाराष्ट्रात दारू महागणार!

सात्विक-चिरागने यु सिन ओंग-ई यी टियूचा पराभव करून मलेशिया ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा, 2वर्षात 50 अमृत भारत गाड्या चालवल्या जातील

पुढील लेख
Show comments