Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवाब मलिक यांनी 'पुरावे 'दाखवत समीर वानखेडे यांना विचारले -आपली मेहुणी देखील ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे का ?

Webdunia
सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (11:52 IST)
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकलेले महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेवर आणखी एक आरोप केला आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ताज्या हल्ल्यात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक प्रश्न टाकला असून त्यांच्या पत्नीची बहीण (मेहुणी) हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यापारात गुंतलेली होती का, असा सवाल केला आहे. हा मुद्दा सिद्ध करण्यासाठी मलिक यांनी कथित पुरावेही शेअर केले आहेत. 2 ऑक्टोबरला एनसीबीने क्रूझवर छापा टाकला आणि 3 ऑक्टोबरला आर्यन खानला अटक केली. 
 
सोमवारी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, 'समीर दाऊद वानखेडे आपली मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात होती का? त्यांचे  प्रकरण पुणे न्यायालयात प्रलंबित असल्याने आपण याचे उत्तर द्यावे. हा पुरावा आहे. या ट्विटसोबत नवाब मलिकने काही स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत, ज्यामध्ये एका प्रकरणाचा उल्लेख केला जात आहे. हे प्रकरण 2008 चे आहे. 
मात्र, नवाब मलिक यांच्या या आरोपावर समीर वानखेडे यांचेही उत्तर आले आहे. त्यांनी  नवाब मलिक यांनी लावलेले आरोप फेटाळून लावले असून जानेवारी 2008 मध्ये जेव्हा हे प्रकरण घडले तेव्हा ते सेवेतही नव्हते. एनसीबी अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, त्याने 2017 मध्ये क्रांती रेडकरशी लग्न केले आणि या प्रकरणाशी आपला कसा संबंध आहे हे विचारले. 
 
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला खंडणीसाठी ‘अपहरण’ करण्याच्या कटात एनसीबी समीर वानखेडे सामील असल्याचा आरोप महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी केला. भाजपच्या युवा शाखेचे माजी मुंबई अध्यक्ष मोहित भारतीय हे या कटाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप त्यांनी केले. मोहित भारतीयाचा नातेवाईक ऋषभ सचदेवा याच्यामार्फत आर्यन खानच्या अपहरणाचा सापळा रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. "25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि 18 कोटी रुपयांमध्ये सौदा ठरला होता. 50 लाख रुपये देण्यात आले," असा दावा त्यांनी केला. केपी गोसावी (क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील NCB साक्षीदार) आर्यनसोबतचा सेल्फी त्याच्या अटकेनंतर व्हायरल झाल्याने हा सौदा रद्द  झाला.
     
नवाब मलिक यांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर वानखेडे कुटुंबीयांनी राष्ट्रवादीच्या नेत्यावर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर गेल्या महिन्यात आर्यन खानला अटक करण्यात आली होती आणि जहाजातून अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. आर्यनला नंतर मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

ठाण्यात मृत व्यक्तीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

ठाण्यात २.२१ लाख रुपयांचा गुटखा जप्त, तर लग्न समारंभात हवेत रिव्हॉल्व्हर चालवल्याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

17 february आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी विशेष

कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांना अटक

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments