Dharma Sangrah

राज्य मंडळाचा इयत्ता पहिली ते नववीच्या निकाल प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल, उत्तरपत्रिका दाखवणे बंधनकारक

वेबदुनिया न्यूज टीम
बुधवार, 29 एप्रिल 2026 (13:20 IST)
राज्यात उन्हाळी सुट्ट्या यंदा २  मे पासून लागणार असून १ मे रोजी इयत्ता पाहिली ते इयत्ता नववीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्य मंडळाने निकाल प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले असून पहिल्यांदाच इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचा पालकांना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दाखवणे शिक्षकांसाठी बंधनकारक केले आहे.
ALSO READ: दहावी-बारावी निकाल: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बोर्डाचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता; शिक्षण मंडळात खळबळ
शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका व्यवस्थित आणि बारकाईने तपासावी लागणार आहे. या संदर्भात शिक्षण आयुक्तांनी आदेश जारी केले आहे.  
ALSO READ: फडणवीस सरकारने शिंदे यांचे ११ तलाव प्रकल्प थांबवले
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांचा विकास होणे आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता ओळखणे आवश्यक आहे त्यानुसार, निकालाच्या दिवशी निकाल येताना त्यांच्या उत्तरपत्रिका दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणे करून अचूक मूल्यांकन करता येईल. तसेच पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची अध्ययनातील गरज ओळखून योग्य उपाययोजना करता येऊ शकेल. या निर्णयामुळे पालकांची जबाबदारीही वाढणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालक अधिक सजग व जबाबदार बनतील.
ALSO READ: भाजपचा मोठा निर्णय, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित झाली
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयी जसे वाचन, लेखन आणि वेळेचे नियोजन विकसित करण्यासाठी पालक सक्रिय सहभाग घेतील. शाळा आणि घर यांच्यात समन्वय वाढून सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण होईल.या उद्देशानेच राज्य मंडळाच्या सर्व शाळांनी १ मे रोजी निकालावेळी पालकांना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दाखवण्याचे आदेश देण्यात आले आहे. 
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

नीट यूजी परीक्षा वाद छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

KKR vs GT : आयपीएल २०२६ च्या ६० व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार

'या वेळी, थेट डोक्यात गोळी...' बिश्नोई टोळीकडून पुण्यातील व्यावसायिकाला धमकी

NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई: पुण्यातील वरिष्ठ वनस्पतीशास्त्र शिक्षिकेला दिल्लीत अटक

LIVE: NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई: पुण्यातील एका ज्येष्ठ वनस्पतीशास्त्र शिक्षिकेला दिल्लीत अटक

पुढील लेख
Show comments