Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दहावीच्या विद्यार्थ्यांने आय सी यु मध्ये बसून दिला पेपर

दहावीच्या विद्यार्थ्यांने  आय सी यु मध्ये बसून दिला पेपर
, शनिवार, 23 मार्च 2019 (09:58 IST)
दहावीची परीक्षा काळात एक विद्यार्थी जिन्यावरून पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला एका खासगी हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभाग आयसीयुमध्ये दाखल केले होते. मात्र या मुलाची जिद्द व बोर्डाची साथ यामुळे त्यानी दहावीचा भूगोलाचा अखेरचा पेपर रूग्णालयातून दिला आहे.नाशिक शहरातील ओझर येथील एचएएल हायस्कूलचा विद्यार्थी प्रणव माळी हा नियमीतपणे दहावीचे पेपर देत होता. मात्र गुरूवारी दि.२१ रोजी तो अपघात होऊन जिन्यावरून पडला होता. यामध्ये नाक फॅक्चर झाले तसेच हाता पायाला दुखापत झाली आहे. शहरातील पंचवटी भागातील खासगी रूग्णालयात त्याला दाखल केले. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्याला ४८ तास अतिदक्षता विभागातच ठेवावे लागले आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाटू लागली, दहावीचा पेपर असल्याने त्यांनी शाळेत मुख्याध्यापकांशी चर्चा केली. एक पेपर देता आला नाही तर हे वर्ष वाया जाईल त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या बोर्डाचे सचिव नितीन उपासनी यांच्याशी याबद्दल त्यांनी संपर्क केला. मुलाचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देऊ यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. प्रणव माळीची जिद्द तसेच पालक आणि मुख्याध्यापकांची इच्छा बघून उपासनी यांनी त्याला सहकार्य करण्याचे ठरविले. यसीयुमध्ये परीक्षा घेण्याची तयारी केली. वैद्यकिय अहवाल, प्रमाणपत्र, मुख्याध्यापकांचे शिफारसपत्र मागवून घेण्यात आले. ते त्यांनी बोर्डाला आज सादर करण्यात आले होते. ओझरवरून त्या मुलाचा बारकोड असलेली उत्तर पत्रिका मागून घेण्यात आली. पंचवटीतील स्वामी नारायण शाळेतून उत्तरपत्रिका घेण्यात आली. व १० वाजून ५० मिनीटांनी प्रणवला ती दिली गेली. सोबत निमानुसार सुपरवायझरही आयसीयुत नियुक्त केला. एक वाजता त्याचा पेपर घेऊन तो नितीन उपासनी यांनी सीलबंद करून पुन्हा परीक्षा केंद्राकडे पाठवून दिला. त्यामुळे आयसीयुमध्ये असूनही त्याला परीक्षा देता आल्याचे समाधान मिळाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘आयपीएल’चा महासंग्राम आजपासुन; पहिल्या लढतीसाठी धोनी-विराट सज्ज