Marathi Biodata Maker

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची केली अधिकृत घोषणा

Webdunia
गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (18:43 IST)
राज्यात या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेतल्या जाणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. इयत्ता बारावीची बोर्डाची लेखी परीक्षा ही 4 मार्च 2022 ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्डाची परीक्षा ही 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे. दरम्यान या सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून देहात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही दहावी आणि बारावीच्या [परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना विशेष मूल्यांकन पद्धतीनं मार्क्स देण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. दहावी आणि बारावीचे प्रत्यक्ष वर्गी सुरु झाले आहेत. म्हणूनच आता राज्यात या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारवेच्या परीक्षांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
या दरम्यान होणार तोंडी परीक्षा (Oral exam) 
दरम्यान इयत्ता दहावी आणि बारावीच्या तोंडी परीक्षा कधी होणार आहेत याबद्दलही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
इयत्ता बारावीच्या तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 दरम्यान होणार आहे.
तर इयत्ता दहावीच्या तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारी 2022 ते 14 मार्च 2022 दरम्यान घेण्यात येणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

'लाडकी बहीण योजना': e-KYC बाबतच्या खोट्या बातम्यांवर सरकारचे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण

मनसे प्रमुख राज ठाकरे १८ वर्षांनंतर निर्दोष मुक्त; रेल्वे भरती मंडळाच्या उमेदवारांवर हल्ला केल्याचा होता आरोप

NEET पेपरफुटी प्रकरण: पुण्यातील 'RCC' कोचिंग सेंटरवर प्रशासनाचा बुलडोझर; कोर्टाने आरोपींच्या कोठडीत केली मोठी वाढ

LIVE: NEET पेपरफुटी: पुण्यात मोटेगावकर यांचे RCC कोचिंग सेंटर बुलडोझरने पाडले

कॅनडात गँगस्टर बिश्नोई गँगचा थरार? 'क्रिकेट कॅनडा'चे अध्यक्ष अरविंद खोसला यांच्या घरावर भरदिवसा गोळीबार

पुढील लेख
Show comments