Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मिळणार पूर्णविराम; मंत्री परब करणार मोठी घोषणा

ST employees will get full stop  The minister will make a big announcement
Webdunia
बुधवार, 9 मार्च 2022 (21:12 IST)
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर उद्या (१० मार्च) मिटण्याची दाट चिन्हे आहेत. यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब हे उद्या विधिमंडळात मोठी घोषणा करणार आहेत. विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी १० वाजता बैठक होणार आहे. त्यात परब हे घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे.एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरणाशी मिळते जुळते लाभ देण्याबाबत मंत्री परब हे घोषणा करण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या एकूण १६ मागण्या आहेत. त्यावर सरकार सकारात्मक आहे. मंत्री परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन उद्या विधिमंडळात मोठी घोषणा करणार आहेत. त्यामुळे एसटीचा संप मिटण्याची चिन्हे आहेत.
 
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी आहे. हा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयातही गेला. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्रिसदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली. या समितीने दिलेला अहवाल सादर करण्यात आला आहे. एसटीचे विलीनीकरण शक्य नसल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे. त्यानंतर आता सभापती निंबाळकर यांच्या निर्देशानुसार, सरकारने आमदारांची समिती स्थापन केली आहे. त्यानुसार या समितीने आझाद मैदानातील एसटी कर्मचारी आंदोलकांशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगिचले जात आहे. मंत्री परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला भाजपचे प्रवीण दरेकर, शेखर चन्ने, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते.२८ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरवरून महाराष्ट्रात सुरू असलेल्या वादाचा निषेध केला

LIVE: औरंगजेबाबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांचे एक नवीन विधान समोर आले

'पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी शोधण्याची गरज नाही', संजय राऊतांना मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिउत्तर

औरंगजेब आवडो किंवा न आवडो त्याची कबर एक संरक्षित स्मारक आहे, मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान समोर आले

महिला २६ आठवड्यांचा गर्भधारणेचा गर्भपात करू शकते; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

पुढील लेख
Show comments