Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

22 एप्रिल पासून एस टी पुन्हा धावणार

Webdunia
बुधवार, 20 एप्रिल 2022 (10:08 IST)
गेल्या साढे पाच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. राज्य सरकार मध्ये एसटीच्या विलीनीकरण आणि इतर मागण्या घेऊन एसटीचे कर्मचारी संपा वर बसलेले होते. आता एसटी संप संपला असून एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होत आहे. त्यामुळे एसटी आता हळू- हळू पुन्हा आपल्या मार्गावर परतणार असून येत्या 22  एप्रिल पासून पुन्हा धावणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांच्या अडचणी संपणार आहे. एसटी कर्मचारीच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होत होते. त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. त्यासाठी त्यांना दुप्पटीने पैसे मोजावे लागत होते. आता न्यायालयाच्या आदेशानुसार, एकूण 70 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. काल  मंगळवारी 7,435 एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले. 
 
एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन केलं होते. तब्बल साढे पाच महिन्यांपासून हे आंदोलन सुरु होते. या काळात राज्यसरकारने काही कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या असून देखील कर्मचाऱ्यांचे संप सुरु होते. आता उच्च नायायालयाच्या आदेशानुसार, कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू राहण्याचे सांगितले आहे. त्या मुळे  आता  एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपला असून एसटी कर्मचारी आता पुन्हा कामावर रुजू होणार आणि एसटी आता पुन्हा रस्त्यावर धावणार. 
 

संबंधित माहिती

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

पुढील लेख
Show comments