Festival Posters

नाशिकमधील एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम

Webdunia
मंगळवार, 11 जानेवारी 2022 (07:41 IST)
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करत संप मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नाशिकमधील एसटी कर्मचारी अद्यापही आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
 
नुकतीच परिवहनमंत्री अनिल परब आणि शरद पवार यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले. असे असतांना मात्र नाहीकमधील एसटी कर्मचारी संपावर ठाम असून विलनीकरणाची प्रमुख मागणी पूर्ण होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
 
दरम्यान  मुंबई येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह २२ संघटना सहभागी होत्या. बैठकीनंतर संप मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही आनंदाची बातमी असतांना दुसरीकडे नाशिकमध्ये एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याचे दिसून आले.
 
नाशिक येथील कर्मचार्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की आज बैठकीत समील झालेल्या २२ संघटनांशी आमचा संबंध नाही, आमचा दुखवटा आंदोलन सुरूच राहणार असून विलनीकरण होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे सांगितले.
 
त्यामुळे पुन्हा एकदा एका यशस्वी बैठकीनंतरही नाशिक मधील कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा विलीनीकरणा चा तिढा आणखी वाढला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments