Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, मुंबई सह 'या ' 14 जिल्ह्यात पूर्ण अनलॉक प्रक्रिया सुरु

Webdunia
बुधवार, 2 मार्च 2022 (18:55 IST)
सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. राज्य सरकार ने कोरोनाचे निर्बंध शिथिल करत नवी नियमावली जाहीर केली आहे. ही नवी नियमावली 4 मार्च पासून लागू केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील आर्थिक  व्यवहार सुरळीत करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.  
 
या नव्या नियमावलीनुसार, राज्यातील मुंबईसह 14 जिल्ह्यात नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे  100 टक्के पूर्ण क्षमतेने सुरु होणार. 

मुंबईसह मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, सातारा, गोंदिया, चंद्रपूर, आणि कोल्हापूर हे जिल्हे 100 टक्के पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.

खासगी सरकारी आणि निमसरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहणार. लग्न समारंभात आणि अंत्यसंस्कार विधीसाठी निर्बंध शिथिल  करण्यात आले आहे.   
 
ऑफलाईन शाळा सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे. लोकल ने प्रवास करणाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहेत. 

राज्यातील चित्रपट गृहे, उद्यान, मॉल्स वॉटर पार्क पूर्ण क्षमतेने उघडण्याची परवानगी देण्यात आली. मात्र मॉल्स चित्रपटगृहे आणि इतर ठिकाणी लसीचे दोन डोस घेणाऱ्यानाच प्रवेश देणे बंधनकारक. 
 
तर राज्यातील काही उर्वरित जिल्ह्यामध्ये मनोरंजन स्थळे आणि पर्यटन स्थळे 50 टक्केच्या क्षमताने सुरु राहतील. लग्न सोहळा, सांस्कृतिक समारंभात धार्मिक कार्यक्रमात सभागृहात 50 टक्के क्षमता देण्यात आली आहे. राजकीय कार्यक्रमा साठी शैक्षिणक खेळ साठी, अंत्य संस्कारासाठी 50 टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात आली.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

चालत्या ट्रेनमधील एका प्रवाशाला बेदम मारहाण, प्रवाशाचा मृत्यू

LIVE: संतोष देशमुख प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची एंट्री

संतोष देशमुख प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची एंट्री

आईने पकोडे बनवण्यास उशीर केल्याने संतापलेल्या मुलाने घर पेटवले

Naag Nagin Love जेसीबी मशिनच्या धडकेने सापाचा मृत्यू, किती तरी तास नागीन तिथून हलली नाही Viral Video

पुढील लेख
Show comments